Sant Santaji Maharaj Jagnade
वर्धा : वर्ष २०१९ मध्ये राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांची जयंती, राष्ट्रीयदिनाचे कार्यक्रम मंत्रालय, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये साजरे करण्यासाठी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने २६ डिसेंबर रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे. या परिपत्रकात महाराष्ट्राचे थोर संत व तेली समाजाचे आराध्य दैवत संतश्री जगनाडे महाराज जयंती ८ डिसेंबर २०१९ रोजी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्हा तेली समाज सेवाभावी संघ शाखा कळंब च्या वतीने आज कळंब शहरात संताजी जगनाडे महाराज यांची ३९५ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी समाजाचे जिल्हाअध्यक्ष रवि कोरे आळणीकर,जेष्ठ मार्गदर्शक तथा माजी जि प सदस्य कोंडाप्पा कोरे ,जिल्हा कोषाध्यक्ष महादेव मेंगले,उस्मानाबाद तालुकाध्यक्ष दत्ताञय बेगमपुरे,सुर्यकांत चौधरी आदि
तेली समाज सेवाभावी संघ धाराशिव तालुकाध्यक्षपदी दत्तात्रय बेगमपुरे
जिल्हा प्रतिनिधी धाराशिव, दि. २२ सप्टेंबर धाराशिव तेली समाजाच्या धाराशिव तालुकाध्यक्षपदी दत्तात्रय चंद्रकांत बेगमपुरे व उपाध्यक्षपदी महेश रामेश्वर करंडे यांची निवड करण्यात आली. ही निवड तेली समाज सेवाभावी संघाच्या बैठकीत दि. २२ रोजी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि. प. सदस्य कोंडाप्पा कोर, जिल्हाध्यक्ष रवी कोरे, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ घोडके, सचिव अॅड. विशाल साखरे, कोषाध्यक्ष महादेव मेंगले,
डॉ. सुधाकर चौधरी राहुरी जि. अहमदनगर
मा. जयदत्तजी क्षीरसागर आपली अखिल भारतीय तैलिक साहू महासभा अध्यक्षपदी निर्विवाद एकमताने निवड, कॅबिनेट मंत्री बांधकाम (उपक्रम) पदी नियुक्ती, बहुमताने आमदार म्हणून निवड तसेच दि.7 डिसेंबर आपल्या वाढदिवसानिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा! हार्दिक अभिनंदन !!
धुळे : सोशल मिडीयाचा वापर अलीकडे वाढल्यामुळे प्रत्येकजण अनेक व्हॉटस्अॅप ग्रुपशी जोडलेला आहे. परंतु, अनेक ग्रुपमधील संदेश हे ब-याचदा निरुपयोगी असतात. त्यामुळे हे ग्रुप असून नसल्यासारखे किंवा निव्वळ 'टाईमपास' ठरतात. परंतु, दोंडाईचा येथील प्रकाश चौधरी यांनी व्हॉटसअॅप ग्रुपचा विधायक वापर करत समाजबांधवांना एकत्र करण्याचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत त्यांनी या ग्रुपमध्ये महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेशातील एकूण २०८ गावे जोडली आहेत. विशेष म्हणजे या ग्रुपचा वापर ‘टाईमपास' म्हणून होणार नाही, यासाठी कठोर नियमही तयार केले आहेत.