मराठा तेली समाज विकास मंडळ अमरावती यांच्या सयुक्त विद्यामाने आयोजित (मराठा, तिळवन, लिंगायत) तेली समाज उप वधु-वर परीचय मेळावा आयोजित करण्याचे ठरविले होते, परंतु कोरोनाचे वाढते प्रमाण व नव्यानेच शासनाने जाहीर केलेली नियमावली लक्षात घेता हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात मेळावा न घेता, मोजक्याच समाज बांधवाच्या उपस्तिथीत बंध नात्याचे वार्षिक २०२२
नाशिक :नविन नाशिक तेली समाजाच्या वतीने जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या मूळ गाथेचे लेखनकर्ते राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज यांच्या ३३४ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सोहळा साजरा करण्यात आला. पुण्यतिथीचे औचित्य साधून नवीन नाशिकमधील पत्रकारांचा गौरव करण्यात आला.
पनवेल : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभाग व जय संताजी तेली समाज मंडळ, पनवेल यांच्या वतीने टपाल नाका येथील श्री शनैश्वर मंदिर येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत ५१ जणांनी रक्तदान केले. या सर्वांना प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.
अक्कलकुवा - अक्कलकुवा येथील फर्स्ट आईडिया इंटरनेशनल स्कूल मध्ये संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतीथी साजरा करण्यात आली. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतीथी पर साजरा केल्या जाणाऱ्या दिवसाप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि म्हणून महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा नंदुरबार जिल्ह्याचे उपाध्यक्ष भानुदास चौधरी यांनी प्रतिमेचे पूजन केले.
घोटी - संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे यांचा पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तिभावात घोटीत साजरा करण्यात आला. अभंगांच्या गजरात, संताजींचा जयजयकार करत समाज बांधवांनी सोहळ्यात सहभाग घेतला. प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प. केशव महाराज उखळीकर यांच्या श्रुश्राव्य कीर्तनातही भाविक वर्ग मंत्रमुग्ध झाला होता.