Sant Santaji Maharaj Jagnade
तेली समाज वधु-वर परिचय लग्नगाठ - २०२२ (राज्यस्तरीय पुस्तिका) , * कार्यक्रमाचे स्थळ * तापडिया नाट्य मंदिर निराला बाजार, औरंगाबाद (संभाजीनगर) संपर्क कार्यालयः शॉप नं.३, अक्षयदिप प्लाझा, सिडको बसस्टँडजवळ, जालना रोड, औरंगाबाद (संभाजीनगर) मो.९९२२२३४६२१ * संपर्क कार्यालय * गणेश पवार - 9922234621 शॉप नं.३, अक्षयदिप प्लाझा, सिडको बसस्टँडजवळ, जालना रोड, औरंगाबाद (संभाजीनगर), अशोक लोखंडे - 9421690133 गल्ली नं.१०, पुंडलिक नगर, औरंगाबाद (संभाजीनगर), नोंदणी निःशुल्क. रविवार दि.२४ जुलै २०२२ व रविवार २७ नोव्हेंबर २०२२ सकाळी १०.०० वा.
माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे तैलिक गौरव पुरस्काराने सन्मानित
गडचिरोली येथील नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष योगिता प्रमोद पिपरे यांची सामाजिक सेवा या श्रेणीमध्ये तैलिक गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. संताजी सांस्कृतिक भवन, सोमवारी क्वार्टर बुधवार बाजार, सक्करदरा नागपूर येथे १२ जुलै रोजी युवा फाउंडेशन व आसा ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या संयुक्त विद्यमाने तैलिक समाजबांधवांचा महामेळावा व तैलिक गौरव पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
धुळे - खान्देशातील तेली समाजामध्ये अग्रगण्य असलेल्या खान्देश तेली समाज मंडळ या संस्थेच्या साक्री तालुका अध्यक्षपदी साक्री येथील युवा कार्यकर्ते युवराज पंढरीनाथ महाले यांची निवड करण्यात आलेली आहे. मंडळाचे धुळे शहर अध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी यांचे शिफारशीवरून अध्यक्ष कैलास आधार चौधरी यांच्या आदेशाने सचिव रवींद्र जयराम चौधरी यांनी ही निवड करीत असल्याचे जाहीर केले आहे.
अकोले तालुक्यातील युवा उद्योजक तुषार ओंकार दिवटे यांच्या विवाह सोहळ्यात तिळवण तेली समाजातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने खर्चाला फाटा देऊन तिळवण तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून समाजापुढे नवीन आदर्श निर्माण केला.
धुळे, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा प्रदेशाध्यक्ष व खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली व कार्याध्यक्ष अशोककाका व्यवहारे, महासचिव डॉ. भूषण कर्डिले व कोषाध्यक्ष गजानननाना शेलार, ठाणे विभाग अध्यक्ष सुनील चौधरी, युवा आघाडी प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी, जेष्ठ नेते बबनराव चौधरी यांच्या मार्गदर्शना खाली