उस्मानाबाद, दि. १७ - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने समाज जोडो अभियान रथ यात्रेतील संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची मुर्ती, संताजींच्या पादुका, हस्त लिखीत गाथा यांचे पूजन तुळजापूर नगरीत आई तुळजाभवानीच्या महाद्वार येथे संताजी जगनाडे महाराजांचे ११ वे वंशज गोपाळशेट जगनाडे व बाळासाहेब काळे, तुळजाई पतसंस्थेचे चेअरमन राजाभाऊ देशमाने, जिल्हाध्यक्ष रवी कोरे, राज्य समन्वयक सुनिल चौधरी,
श्री शनैश्वर फौंडेशन, मुंबईच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेस 28 वर्षे पूर्ण झाली. संस्थेतर्फे संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यातून व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या गरजू व होतकरू विद्यार्थ्याला प्रतिवर्षी प्रत्येकी 10 हजार रुपये प्रमाणे, दरवर्षी 120 विद्यार्थ्यांना 12 लाख रुपये पर्यंत रकमेच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते. आतापर्यंत 500 विद्यार्थ्यांना 1 कोटी, 35 लाख रुपयांचे शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा व वीरशैव तेली समाज लातूरच्या वतीने संत जगनाडे महाराज समाज जोडोरथयात्रा लातूर नगरीत भव्य स्वागत करण्यात आले डोल ताशा भजनी मंडळ फटाक्यांची अतिषबाजी एक नंबर चौक ते हॉटेल प्राईड पर्यंत रथाची मिरवणूक काढण्यात आली महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा लातूर जिल्हा अध्यक्ष विश्वनाथ खडके यांनी या रथाचे स्वागत केले.
तेली समाजाचे श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त कळंब मध्ये संताजी जगनाडे महाराज यांचे जीवन चरित्र वाटप करण्यात आले. व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळकृष्ण गुरसाले हे होते.
अहमदनगर : समाजाची उन्नत्ती व्हावी, यासाठी संघटन महत्वाचे असते. पदाधिकार्यांच्या चांगल्या कामातून हे शक्य होते. तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने गेल्या काही वर्षात समाज बांधवांचे मोठ्या प्रमाणात संघटन करुन एकीचे बळ दाखवून दिल्याने प्रश्न सुटत आहे. त्यामुळे विविध उपक्रमांतून समाजाची प्रगती साध्य होत आहे