Sant Santaji Maharaj Jagnade
जुन्नर, पुणे :- तिळवण तेली समाजाचे आराध्य दैवत तुकाराम महाराजांचे ग्रंथ लेखक संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी सोहळा नारायणगाव शहरात श्री लक्ष्मीनारायण मंदिरात भव्य दिव्य स्वरूपात साजरा झाला, सकाळी सहा वाजता मंदिरात जगनाडे महाराजांना अभिषेक करून महाआरती करण्यात आली.
चंद्रपूर - तेली समाज संघटनात्मदृष्ट्या मोठा आहे. त्यामुळे तेली समाजबांधव सद्धा मोठा झाला पाहिजे. समाजाला जोडायचे असेल तर तेली समाजाचे एकत्रीकरण करणे महत्त्वाचे आहे. राजकारणामध्येही समाजबांधवांना पाठिंबा दिला पाहिजे, असे मत महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे कोषाध्यक्ष गजानन शेलार यांनी व्यक्त केले.
तेली युवा आघाडीच्या वतीने तेलीखुंट येथे "संत श्री संताजी महाराज चौक" या फलकास पुष्पहार अर्पण करण्यात आला.श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जयजयकार व जयघोष करण्यात आला. याप्रसंगी युवा आघाडीचे अध्यक्ष गणेश धारक, अनिल देवराव, गणेश म्हस्के, उमाकांत डोळसे, शुभम भोत, नागेश भागवत, दिपक शेलार, उमेश काळे, सागर भगत,
अमरधाम येथे संत श्री संताजी जगनाडे महाराज व जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या मंदिरात पुष्पहार अर्पण करुन पुजन करण्यात आले.याप्रसंगी अंत्यविधीचे पवित्र कार्य करणारे संकेत कुर्हे यांना फेटा बांधून श्रीफळ गुलाब पुष्प भेट देऊन बंद पाकिटात देणगी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी हरिभाऊ डोळसे बोलत होते. यावेळी सुरेश करपे, देविदास ढवळे, देविदास साळुंके, श्रीराम हजारे, परसराम सैंदर, अरविंद दारुणकर, गणेश हजारे,
नगर - श्री संत संताजी जगनाडे महाराज यांनी जगदगुरु संत तुकाराम महाराज यांची बुडालेली गाथाचे स्मरण करुन पुन्हा लेखन केले.अभंग व गाथा अमर केली.संताजी महाराजांचे देहावसन झाले असता. श्री संत तुकाराम महाराजांनी दिले वचन पाळुन पृथ्वीवर पुन्हा वैकुंठातून आगमन केले.व त्यांना मुठमाती दिली. असे गुरु शिष्याचे श्रेष्ठ नाते होते.