Sant Santaji Maharaj Jagnade चांदवड - स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त येथील श्री नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालयात संत संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिमेला प्राचार्य डॉ. संगीता बाफना यांनी पुष्पहार अर्पण केला. उपप्राचार्य संदिप समदडिया यांनी प्रास्ताविक केले तर उपशिक्षक ए. यू. सोनवणे यांनी मनोगतातून संत जगनाडे महाराज यांचा जीवनप्रवास उलगडून सांगितला.
चांदवड :- श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचा जयंती सोहळा येथे साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ समाजबांधव सोनुपंत ठाकरे व राऊत बाबा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संताजी महिला मंडळाची नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली.
जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे अभंगाचे लेखक व आराध्य दैवत संत संताजी जगनाडे महाराज यांची ३९७ वी जयंती समस्त तेली समाज ,राजगुरूनगर यांचे वतीने साजरी करण्यात आली . बुधवार दि ०८/१२/२०२१ रोजी सकाळी ९.०० ते ११.०० या वेळेत तिळवण तेली समाज कार्यालयाचे सभागृहात झालेल्या कार्यक्रमात संताजी महाराज यांची जयंती उत्सव साजरा झाला.
मालेगाव :- थोर संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती शहर व तालुक्यात उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. मालेगाव कॅंप येथे संताजी उत्सव समितीतर्फे प्रतिमा पुजन करण्यात आले.याप्रसंगी १९७१च्या युद्धात भाग घेतलेले धोंडु चित्ते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. १८० जणांनी यात सहभाग नोंदवला.संताजी मंगल कार्यालय मालेगाव येथेही जयंती कार्यक्रम संपन्न झाला.
साखळी ग्रामपंचायत कार्यालयात ८ रोजी श्री संत शिरोमणी संताजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमात जळगाव जिल्हा परिषदेचे शिक्षण, क्रिडा व आरोग्य सभापती रविंद्र सूर्यभान पाटील यांच्या हस्ते श्री संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्रा.पं. सदस्य सय्यद अशपाक सय्यद शौकत, श्रीमती रुखमाबाई निळे,