ब्राह्मण व मराठ्यांची संत संताजी विचार वंशावर दहशद ?( भाग 5) , ऑक्टोबर तेली गल्ली 2009
संत साहित्याचे अभ्यास वि. ल. भावे गाढे आभ्यासक दत्तो वामन पोतदार हे जन्माने ब्राह्मणा होते. परंतू त्यांनी संत संताजींना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला किंवा संत संताजी हा एक मानवतेचा महामार्ग आहे ही ओळख करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार प्रथम मी मानत आहे. जे आहे त्याला आहे म्हंटलेच पाहिजे खोटे आहे त्याला खोटारडे म्हणून सारलेच पाहिजे. मग इथे कोणाच्या बाला का घाबरायचे.
ब्राह्मण व मराठ्यांची संत संताजी विचार वंशावर दहशद ? ( भाग 4) , ऑक्टोबर तेली गल्ली 2009
मनुस्मृतीच्या विचार वंशााची आपण चिरफाड करतोय. ती चिरफाड केली तरच आकाशाला गवसणी घालणारे संत संताजी समजणार आहेत. प्रथम एक सत्य घटना मांडतो. संत ज्ञानेश्वरांचे पालन कर्ते संत भोजलिंग काका त्यांची समाधी संत ज्ञानेश्वर समाधी जवळ आहे. आपण जी ज्ञानेश्वरी पवित्र समजुन जपतो. त्या । ज्ञानेश्वरीत काय काय बदल केले हा भाग इथे गौन मानून प्रथम वाटचाल करू.
ब्राह्मण व मराठ्यांची संत संताजी विचार वंशावर दहशद ? ( भाग 2), ऑक्टोबर तेली गल्ली 2009
घरात संताजींचा फोटो. संताजी उत्सवात सहभाग, संताजीच्या नावाने सुरू असलेल्या संस्थेत सत्तेची साठमारी, संत संताजींचा उत्सवा साठी पन्नास साठ रूपये देऊन पुण्य घेणारी मंडळी. वधुवरांच्या (व्यवसायीक बेगडी समाज प्रेम मेळाव्यास) मॉल मध्ये किमान दहा लाख गोळा करून साजरा करिताना संत संताजी प्रतिमा फक्त पुजना पुरती आसते. हे केले म्हणजे संताजी सेवा, संताजी विचार ही अपली अतिशय चिंचोळी तोकडी संताजी प्रेमाची वहिवाट.
ब्राह्मण व मराठ्यांची संत संताजी विचार वंशावर दहशद ? ( भाग 1) , ऑक्टोबर तेली गल्ली 2009
समाजातील सुज्ञ बांधव श्री पन्हाळे साहेब (पोलिस सब इन्पेक्टर) यांनी जेंव्हा सुदूंबर ते पंढरपूर या संत संताजी महाराजांच्या पालखी दरम्यान वाखरी येथे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या प्रमुखांनी आंदोलन पुकारले होते. तेंव्हा विचारले त्या बद्दल मी माझे मत थोडक्यात दिले पण आज ते सविस्तर मांडत आहे. हा विचार प्रपंच मांडण्या पूर्वी आपणा विचार वंश प्रथम समजुन घेऊ.
ध्येय जितके महान तेवढा त्याचा मार्गही लांब व खडतर असतो असे विचारवंतानी म्हटले आहे. अशाच ध्येयातून काही माणसे आपली वाटचाल करतात. खंडाळा , ता. वैजापूर सारख्या ग्रामीण भागात एका शेतकरी कुंटूबात कचरू वेळंजकर यांचा १० जुन १९६७ रोजी जन्म झाला. शेतीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कुंटूंबात जन्माला आल्याने बालपणापासुनच वेदना, दुःख, सामाजिक भान ह्या जाणिवा निर्माण झाल्या.