लेखक: अर्जुनराव भगत (बुर्हाणनगर), श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
१) क्षेत्र वर्णन - बुर्हाणनगर हे अहमदनगर पासून सुमारे ५ किलोमिटर अंतरावर १००० लोकवस्तीचे लहानसे खेडेगाव आहे. ते अती प्राचीन असून नगर शहराच्या अगोदर लहानसे शहर होते. त्याठिकाणी १९१३ साली श्री. लहानु भिकु भगत (देवकर) यांनी स्वखर्चाने श्री तुळजापूर देवींचे भव्य मंदिर बांधले.
लिंब : सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघटनेच्यावतीने पंचवीस हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री साहाय्यता निधीस देण्यात आला. कोरोनाच्या संकटात सापडलेल्या महाराष्ट्राला सावरण्यासाठी राज्यातील अनेक दानशूर व्यक्तींनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मोठी मदत होत आहे.
कै. सावळेराम गुंडीबा देवकर, देवकर घराण्यात प्रसिद्ध. त्यांना एकच मुलगी व तिला देखिल मूलबाळ नव्हते. म्हणून त्यांनी वुईलपत्र केले की, तेली समाजास माझ्या मुलींच्या निधनानंतर ती जागा समाजाने ताब्यात घ्यावी व त्या ठिकाणी मंदिर बांधावे.
धुळे तेली समाजाचे माजी अध्यक्ष तथा कुसुंबा येथील रहिवासी शांताराम उखडू चौधरी यांचे हृदय विकाराने निधन झाले. शिरपूर नगर परिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा तथा नगरसेविका सौ. छाया शामकांत ईशी यांचे ते वडील तर महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शामकांत ईशी याचे सासरे व पुणे येथील खान्देश तेली समाज मंडळाचे संस्थापक विश्वनाथ उखडू चौधरी, कुसुंबा येथील दिलीप चौधरी, रविंद्र चौधरी यांचे बंधू होत.
घोडेगाव : कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या पलंग उत्सवाला घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे सुरवात झाली. पलंगाच्या दर्शनासाठी नागरिक येऊ लागले आहेत.
हा पलंग येथे १० दिवस असतो. तुळजापूरच्या भवानी मातेच्या पलंगाची मिरवणूक तुळजापुरात झाल्यानंतर शिलंगणानंतर मातेची मूर्ती पलंगावर विराजमान केली जाते. विजयादशमी ते कोजागरी पौर्णिमा या काळात तुळजाभवानी माता या पलंगावर विश्रांती घेते.