अर्जुनराव मारुतीराव इंगळे, B.Sc. special Executive magistrate
सेकेटरी, तिळवण तेली समाज ट्रस्ट, अहमदनगर अर्जुन राव यांचा जन्म अहमदनगर येथे १८ मार्च १९३९ रोजी झाला. यांचे इंगळे घराणे हे अहमदनगर येथील तिळवण तेली समाजातील प्रसिद्ध व सुखवस्तु घराणे म्हणून ओळखले जाते. कै. काशिनाथ भिवसेन इंगळे तसेच कै. दशरथ व कै. बाबुराव इंगळे हे तीन बंधु या घराण्याचे आधार स्तंभ होत.
कै. शंकरराव विश्राम काळे मुळचे वाळकीचे. शरीरयष्टी सडपातळ, रंगाने गोरे, लहानपणा पासून शांत व धार्मिक स्वभावाचे. दर आषाढीस पंढरपूरची वारी करणे. तसेच देहू आळंदीस जाणे, गोकर्ण, महाबळेश्वर, गया, प्रयाग, काशी वगैरे सर्व क्षेत्र फिरुन आले. त्यांना नाना या नावाने ओळखत. मुखात नेहमी पांडुरंगाचे नामस्मरण. ज्ञानेश्वरी अगदी मुखोद्गत. पहाटे उठून प्रातःविधी स्नान, पूजा आटोपून श्री ज्ञानेश्वरी वाचन.
कै. गणपतराव विश्राम काळे मुळचे राहणारे वाळकी म्हणून वाळकीकर या नावाने ओळखले जात शरीरयष्टी सडपातळ, उंच काठी गौरवर्णीः हट्टी स्वभाव व रागिट. वडिलांशी पटले नाही. त्यामुळे त्यांचे १५ व्या वर्षी लग्न होवून सासूरवाडीस (काष्टी) तेलघाण्याचा धंदा, दौंड काष्टी असा तेलाचा व्यापार करीत. नंतर काही दिवसांनी परत वाळकीस सहकुटुंब आले. परत काही दिवसांनी नगर. माळीवाडा वेशीजवळ जागेत तेलाचा धंदा सुरु केला.
श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
जन्म नगर, शिक्षण बेताचे शरीर यष्टी सडपातळ बोलण्यात काटकपणा लहानपणा पासून कष्ठाळू वृत्ती. त्यांच्या पत्नी ठकबाई त्यांचे बरोबर काम करुन सहाय्य त्यामुळे धंद्यात आर्थिक बचत. तेल घाण्याचा व्यवसाय व हळद विकण्याचा धंदा म्हणून त्यांना हालदे या नावाने हाक मारीत.
श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
यांना मंडईतील सावकर म्हणून हांक मारीत असे. शरीर बांधेशूद उंची ६॥ ते ७ फूट रस्त्याने चालले म्हणजे त्यांचेकडे लोक कुतुहुलाने पाहत. मुळचे भिंगारचे नंतर नगरला आगमन.