श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
लेखक : पी. जी. जगदाळे अॅडव्होकेट
तिळवण तेली समाज मुलतः आर्थिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असला तरी अत्यंत धार्मिक व कष्ट करणारा. घरची आर्थिकस्थिती गरीबीची मात्र धार्मिक ओढा व तिर्थयात्रा करण्याची प्रबळ इच्छा. महादेव दारुणकर व त्यांचे सौभाग्यवतीना शांत बसू देईना. अखेर बद्रीनाथ यांचा आर्थिक अडचणीने पायीच करण्याचा निश्चय त्यांनी पूर्ण केला.
तिळवण तेली समाजातील नगर जिल्ह्यातील पहिले डॉक्टरकीची परीक्षा उत्तीर्ण झालेले थोर समाज सेवक डॉ एस. टी. महाले यांच्या कार्याची थोडक्यात माहिती खाली देत आहोत. डॉ. एस. टी. महाले यांचा जन्म १४ मे १९२५ रोजी सिन्नर जिल्हा नाशिक येथोल दापूर या गावात एका सामान्य तेली कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सिन्नर व नगर जिल्ह्यातील संगमनेर येथे झाले. शिक्षण चालू असतानाच व बाह्य जगाचा कोणताही अनुभव नसलेल्या डॉक्टराचे वडील ते ११ वर्षांचे असताना वारले.
तेली गल्ली, एप्रिल 2010
पुणे - तिळवण तेली समाज संस्था भवानी पेठ पुणे या संस्थेची निवडणूक डिसेंबर २००८ मध्ये झाली होती. यावेळी परिवर्तन पॅनेलचे १५ जन बहुमताने निवडुन आले. पहिल्या प्रथम श्री. रामदास धोत्रे संस्था अध्यक्ष झाले. त्यांनी पुर्वी ठरल्या प्रमाणे आपला अध्यक्ष पदाचा राजीनामा समाज विश्वस्ता कडे जमा केला. त्या नंतर १५ सदस्यांच्या मिटींग मध्ये श्री. संजय दत्तात्रय भगत यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले.
महिला आरक्षण व तेल्यांची जनगनणा यात आमचा काय संबंध ? (भाग 3 ) एप्रिल 2010
तुमचा पक्ष कोणता ? तुमचा नेता कोणता ? या गोष्टीशी आमची बांधीलकी शुन्य कारण तुम्ही सर्व मंडळी तेली म्हणुन जेंव्हा समाज पातळीवर - येता तेंव्हा तेल्यांच्या विकासाच्या गप्पा मारता पण तेल्यांच्या विकासाच्या संधी समोर येतात तेंव्हा तुमच्या पक्ष नेत्या समोर तुम्ही गप्प आसता हे वास्तव तुम्ही किती ही लपवले तर लपत नाही. महिला आरक्षण राज्यसभेत मंजुर झालेच आहे.
महिला आरक्षण व तेल्यांची जनगनणा यात आमचा काय संबंध ? (भाग 1 ) एप्रिल 2010
मार्च २०१० च्या अंकात तैलीकच्या पदाधिकारी मंडळीना जरा वास्तवतेचे भान करून दिले. बऱ्याच बांधवांनी फोन, प्रत्यक्ष भेटी तर काहींनी (वास्तवातेचे भान ठेवणाऱ्या कारभाऱ्याच्या बोंगळ्या कारभारा विषयी बरे लिहीले. परंतू तैलिक बरी आहे म्हणुन चुकावर पांघरून घालून कारभाऱ्यांना सावरणाऱ्या काही बांधवांनी जरा अति लिहीले हा सल्ला दिला कारभाऱ्यांचा नाकर्तेपणा समाजाच्या नुकसानीपेक्षा फार मोठा प्रतिष्ठेचा आहे.