सातारा येथे महाराष्ट्र प्रांतीय तैलिक महासभेच्या वतीने तेली समाजाचा भव्य मेळावा, गुणवंत विद्यार्थी गौरव, रोख बक्षीस वितरण, शिष्यवृत्ती प्रदान आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात सातारा जिल्ह्यातील तेली समाजातील 85% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र प्रांतीय तैलिक महासभा आणि संताजी अखिल तेली समाज संघटना, आर्वी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि नामवंतांचा सत्कार समारंभ आर्वी येथील आशिर्वाद मंगल कार्यालय, जाजुवाडी येथे मोठ्या थाटात संपन्न झाला.
भारतीय जीवन विमा निगमचे (LIC) उच्च श्रेणी सहाय्यक आणि महाराष्ट्र प्रांतीय तैलिक महासभा, आष्टी तालुका अध्यक्ष मा. श्री. धनराजजी हिरुडकर यांनी 30 जून 2025 रोजी वरुड शाखेतून सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यांनी 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकालात साकोली, गडचिरोली, आर्वी आणि वरुड येथे आपली सेवा दिली.
नागपूर, : जवाहर विद्यार्थी गृह, नागपूर या संस्थेच्या वतीने तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी, प्रज्ञावंत व्यक्ती आणि समाजासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. हा समारंभ ७ सप्टेंबर २०२५ रोजी संस्थेच्या सिव्हिल लाइन्स येथील कार्यालयात संपन्न होणार आहे.
हिंगोली: तेली सेनेच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी कुरूंदा (ता. वसमत) येथील प्रख्यात समाजसेवक डॉ. कैलास परसराम बारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती नांदेड विभागीय अध्यक्ष प्रभाकर गाजरे यांनी जाहीर केली. सामाजिक कार्यात आपल्या विधायक नेतृत्वासाठी ओळखले जाणारे