वालसावंगी - येथे रविवारी (ता.०८) तारखेला सकाळी ९ वाजता विठ्ठल मंदिर येथे तेली सम जाचे आराध्य दैवत संत संताजी जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी झालेल्या कार्यक्रमात गावातील मान्यवरांच्या हस्ते संत जगनाडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
पाटण : येथील समाज बांधवांच्या वतीने संत तुकाराम महाराज यांच्या गाथेचे लेखनकर्ते आणि संवर्धक संताजी महाराज जगनाडे यांची ४०० वी जयंती पश्चिम महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभेचे उपाध्यक्ष पोपटराव गवळी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.
मंगळवेढा : श्री संत जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती नगरपरिषद मंगळवेढा, श्री संत दामाजी मंदिर व रिद्धी सिद्धी गणपती मंदिर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विरशैव लिंगायत तेली समाज मंगळवेढ्याचे सर्व समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
यवतमाळ : विदर्भ तेली समाज महासंघाच्या वतीने यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगूळकर यांचा सत्कार करण्यात आला. संताजी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रायमल, राष्ट्रीय तेली समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल जिपकाटे, संताजी बीसी ग्रुपचे सदस्य वसंतराव ढोरे,
गंगापूर दि.८ डिसेंबर: श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची यांची ४०० वी जयंती साजरी करण्यात आली संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्त गंगापूर मध्ये संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली.