Sant Santaji Maharaj Jagnade
अकोला, दि. ८ : तेली समाजाचे आराध्य दैवत श्री. संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती निमित्त सोमवार दि. ८ डिसेंबर रोजी अकोला येथील शिवाजी नगर स्थित आई तुळजा भवानी मंदिर येथून संताजी महाराज शोभा यात्रेचे आयोजन तेली समाज अकोला जिल्हयाच्या वतीने करण्यात आले होते. सदर शोभा यात्रा ही शिवाजी नगर, जयहिंद चौक, सिटी कोतवाली, चौक, गांधी चौक, खुले नाट्यगृह चौक, मार्गक्रमण करत प्रमिलाताई ओक हॉल येथे यात्रेचा समारोप
छत्रपती संभाजीनगर - संत तुकाराम महाराजांचे प्रिय शिष्य, अभंग गाथेचे रक्षक आणि तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची ४०१ वी जयंती रविवार, ८ डिसेंबर २०२५ रोजी चेलीपुरा येथे समाजसेवक कचरू वेळंजकर यांच्या प्रांगणात अतिशय उत्साहात, भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.
सिल्लोड (जि. छत्रपती संभाजीनगर )। संत तुकाराम महाराजांचे प्रिय शिष्य, अभंग गाथेचे रक्षक आणि तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती सिल्लोड शहरात अतिशय उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. तिळवण तेली समाज बांधवांच्या वतीने सिल्लोड शहरातील
धाराशिव - धाराशिव येथे संत जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील संत जगनाडे महाराज चौकात जयंती सोहळा साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवरानी यावेळी संताजी जगनाडे महाराज यांच्या कार्याचा गौरव केला.
मंगळवेढा (जि. सोलापूर)। संत तुकाराम महाराजांचे प्रिय शिष्य, अभंग गाथेचे रक्षक व तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंदाची जयंती मंगळवेढ्यातील श्री संत दामाजी मंदिरात अतिशय भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. हा सोहळा वीरशैव लिंगायत तेली समाज मंगळवेढा व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.