Sant Santaji Maharaj Jagnade
सोनई (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर ) : तिळवण तेली समाजाच्या वतीने संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. संताजी महाराज हे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे प्रमुख लेखक आणि संत परंपरेतील थोर व्यक्तिमत्व मानले जातात. त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित हा उत्सव सोनई येथील भजनी मंडळ मंदिरात दि. १० ते १७ डिसेंबर या कालावधीत पार पडला.
अमरावती : संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती पर्वानिमित्त एक विशेष आणि प्रेरणादायक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दि. ८ डिसेंबर रोजी संताजी भवन, उषा कॉलनी, एम.आय.डी.सी. रोड, अमरावती येथे 'श्री संताजी जगनाडे महाराज : संतत्व व कवित्व' या पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा संपन्न झाला. हे पुस्तक संताजी महाराजांच्या संतत्वाच्या आणि कवित्वाच्या पैलूंचा सखोल अभ्यास करणारे आहे.
जळगाव : अनावश्यक खर्च टाळण्यासाठी आणि समाजात समानता निर्माण करण्यासाठी सामूहिक विवाह सोहळे आयोजित करणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळाच्या वतीने रविवारी (१४ डिसेंबर) शांताराम नारायण चौधरी नगर (खान्देश सेंट्रल) येथे आयोजित वधू-वर परिचय मेळाव्यात ते बोलत होते.
गडचिरोली : श्रीसंत शिरोमणी जगनाडे महाराज यांचा जयंती उत्सव येत्या २७ डिसेंबर रोजी शहरातील आरमोरी मार्गावरील संताजी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. १४ डिसेंबर रोजी पार पडलेल्या तेली समाज संघटनेच्या नियोजन बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. बैठकीत श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्याने काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
जळगाव जामोद (बुलढाणा जिल्हा) येथे दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराजांची ३२६वी पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. हा उत्सव तेली समाज पंच मंडळ जळगाव जामोद यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. संताजी जगनाडे महाराज हे संत तुकाराम महाराजांच्या काळातील थोर संत आणि अभंग गाथेचे प्रमुख लेखक मानले जातात.