Sant Santaji Maharaj Jagnade
२६ जानेवारी २०२३ आज स्वतंत्र भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन व आपल्या जिल्ह्याचा स्वाभिमान जपलेल्या अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा या आपल्या समाज संस्थेचा द्वितीय २ रा वर्धापनदिन, यानिमित्ताने आपल्या सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिल्या गेल्या.
दिनांक 28/1/2023 ला जवाहर विध्यार्थी गृह, संत्रा नगरी व मेट्रो सिटी नागपूर येथे आयोजित करण्यात आले. विविध वयोगटाच्या मुली व महिलांनी आपल्या कलेचे प्रदर्शन केले. सौ. पूजा कांबळे यांनी साकारलेली श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांची हुबेहू रांगोळीने विशेष लक्ष वेधले, कार्यक्रमात नृत्य, लावणी , पोवाडे, उखाणे, गाणे, गेम्स व अन्य आयोजनामुळे महिलांनी कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला
श्री. संताजी तेली समाज राज्यस्तरीय सर्व शाखीय उप वधू-वर व पालक परिचय मेळावा वर्धा, ता. जि. वर्धा. आयोजक : श्री संताजी जगनाडे महाराज फाऊंडेशन, वर्धा. कार्यालय : द्वारा मनिषा लॅण्ड डेव्हलपर्स, 'वरदविनायक कॉम्प्लेक्स', पारस आईस फॅक्टरी चौक, प्रताप नगर, बॅचलर रोड, वर्धा. - ४४२००१ व्हॉटस् अॅप ः ९३२५९६९९७१ (कार्यालय) निःशुल्क नोंदणी अर्ज कार्यक्रम दिनांक: रविवार, ०८ जानेवारी २०२३
औरंगाबाद जिल्हा तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा - २०२३ व सामुदायिक विवाह सोहळा वेळ सकाळी ९ ते सां. ६.०० वा. रविवार दि. २६ फेब्रुवारी २०२३ मेळाव्याचे ठिकाण : दौलत लॉन्स, जालना रोड, चिकलठाणा, (छ.संभाजीनगर) औरंगाबाद. संपर्कासाठी व कार्यालय पत्ता कार्यालयीन वेळ सकाळी ९.०० ते सायं. ८.०० पर्यंत मिटकर सुपर शॉपी क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या बाजूला मो. ९७६६४२२३५० विशाल हार्डवेअर पुंडलिक नगर रोड, हनुमान चौक औरंगाबाद
श्री संताजी महाराज वधु- वर मेळावा समिती आयोजित राज्यस्तरीय तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा तेली समाज भुषण पुरस्कार व आदर्श माता सन्मानश्री संताजी जगनाडे महाराज तेली संस्था श्री क्षेत्र सदुंबरे ता. मावळ जि. पुणे येथे रविवार २२ जानेवारी २०२३ रोजी संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री विजय रत्नपालखी उद्घाटक श्री अरुणजी काळे पुस्तिका प्रकाशन श्री राजेश झापर्डे, सौ.चित्राताई जगनाडे, सौ विमलताई वाव्हळ आणि सन्माननीय व्यासपीठ यांनी केले