Sant Santaji Maharaj Jagnade
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
संताजी स्मृती :- धुळ्याचे तापीराम चौधरी यांनी सुमारे 10 वर्ष मासिक चालविले. त्यांच्या निंधनानंतर मुलगा अमोल ने ते काही काळ चालविले. सध्या प्रकाशन बंद आहे.
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
दांडगेचे संताजी दर्शन :- बुलढाणा जिल्ह्यातील सागवान येथून विष्णु दांडगे यांनी संताजी दर्शन अनेक वर्ष मासिक स्वरूपात प्रकाशित करून प्रबोधन केले.
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
तेली गल्लीचे देशमाने :- कोणते देशमाने ? तेली गल्लीचे देशमाने हे समिकरण रूढ झालेले देशमाने म्हणजे एकखांबी तंबू ! शिक्षक असलेला हा माणूस सुट्टी व रविवार पाहुन प्रवास करून समाज पिंजला. निवडक सुयश अशा बातम्यांपेक्षा तैलिक प्रबोधनास सर्वोच्च प्राधान्य मुळात समाज सेवेची गोडी दिली वाईचे तत्कालीन सााजिक नेते कै. रामचंद्र मेरूकर यांनी मार्गदर्शन दिले. 1983 ला तेली गल्ली सुरू केले.
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
तेली समाज जागृतीकार पांडुरंग पिसे :- तौलिक प्रबोधनात सिंहाचा वाटा असणारे पांडुरंग पिसें बाबत जेवढे लिहावे तेवढे कमीच होईल. 1975 ते 2005 अशी तब्बल 30 वर्ष तेली बहुल म्हणजे विदर्भात तेली समाज जागृती हे मासिक अव्याहतपणे प्रकाशित केले चांदा टू बांदा असा उभा महाराष्ट्र पालथा घातला, 1999 मध्य स्नहीपुकार साप्ताहिकही काढले पुढे त्याचेच मासिकात रूपांतर झाले.
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
त्यानंतर ही धुरा गो.ना. चौधरींच्या संताजी प्रसाद ने संभाळलेली दिसते. मुळात खानदेशचे गो. ना. मंबईत स्थिरावले ! सामाजिक प्रबोधनाच्या उर्मिने झपाटलेले गो. ना. नी मासिक काढण्याचे ठरविले तसे ते प्राथमिक शिक्षक होते. नोकरी करुन प्रबोधनाचे कार्य करावयाचे होते. मासिकासाठी लागणारा कागदाचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी धोटे शेठांना विनंती केली.