Sant Santaji Maharaj Jagnade
श्री. जयसिंगराव कृष्णाजी दळवी यांचा जन्म सज्जनगडच्या पायथ्याशी वसलेल्या, श्री रामदास स्वामींच्या स्पर्शाने पावन झालेल्या परळी येथे झाला. श्री. कृष्णाजी सावळाराम दळवी व सौ. तानुबाई कृष्णाजी दळवी यांचे हे चौथे अपत्य. 1 बहिण व चार भाऊ अशा कुटुंबामध्ये अतिशय प्रतिकुल परिस्थितीतही परळी येथील शाळेत 7 वी पर्यंत शिक्षण घेतले. परंतु घरच्या परिस्थितीमुळे दुध डेअरी मध्ये 30 रूपये महिना पगारावर नोकरी सुद्धा केली.
माझा उमेदीचा काळ होता. अगदी लहान होतो तेंव्हा ही पाटणचे कै सिताराम बापू गावात आल्यावर घरी येत. चादरीवर किंवा पोत्यावर बसुन चहा पित. कै. सिताराम बापू व त्यांचे बंधु कै. अबा हे आपले मोठे पण विसरून समाजाचे बनत. ही त्यांची ओळख घाटावर किंवा कोकणात पहावयास मिळत असे. मी विष्णू बाळा पाटील यांच्या विषयी लेखन करीत होतो तेंव्हा 1982 साली त्यांचा प्रथम जवळचा संबंध आला. विष्णु बाळा पाटील यांच्या विषयी पुरक माहिती दिलीच परंतू मला पाटणचे शेडगे समजून घेता आले.
फलटणकर हे फलटनचे यांचे मुळ नाव चिंचकर दुष्काळामुळे गाळाप करण्यास करडी शेंगा नाहित म्हणुन मिरज मार्गे कर्नाटक हुबळी येथे गेले. कै. विष्णु फलटणकर व त्यांच्या वडिलांनी प्रथम आपला तेल घाना सुर केला. हुबळीच्या अक्की होंड पसिरात उद्योगाला चालना मिळाली. आणि ते एका एकी कानडी परिसराचे झाले परंतु नाते संबंध सातारच्या माती बरोबर ठेवले.
अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांच्या विशेष शैक्षणिक सुविधा बंद कराव्यात अशी तरतूद राज्य सरकारने नवीन शैक्षणिक धोरणातील मसुद्यात केली होती. विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी या वर टीका केल्यामुळे राज्य शासनाने अनुसूचित जाती व जमाती बाबतच्या तरतुदी त्या मसुद्यातून वगळल्या आहेत.
ओबीसींच्या भरवशावर आपण राज्याचे मुख्यमंत्री झालात याचेही आम्हाला अभिमान वाटत होते. परंतु वर्ष लोटूनही विरोधी पक्षात असताना ज्या ओबीसींसाठी आपण आक्रमकपणा घ्यायचे त्या ओबीसी समाजाच्या एकही विषयाला अद्यापही हात घातला नाही. यावरून आपण ओबीसी समाजाचा वापर मतासाठी तर केला नाही ना असे वाटू लागल्याचा उल्लेख ही पत्रात केला आहे.