धोंडिबा राऊत व दादा भगत यांचा आनंद गगनात मावत नव्हता. या पांडुरंगाच्या भेटीसाठी किती दिव्य केले. त्या दिव्याचे जे फळ आले ते फळ पाहुन त्यांना जसा आनंद होत होता तसेच पालखीबरोबर आलेले व इतर गोळा झालेले हरिभक्त आनंदी झाले होते.
‘‘ आपणास दशम्या हव्यात ना? माझ्याकडे काही आहेत. आपल्याला देऊ घ्या ? ‘‘ महाराज वाटले. त्यांनी त्यांचे पाय धरले. दशम्या देण्याविषयी विनंती केली. त्या वारकर्याने आपल्या गाठोड्यातून दशम्या काढुन राऊताकडे दिल्या. त्यांनी त्या दगडावर ठेवला. परत त्याचे पाय धरले. वारकरी राऊतांना थोपटत व उठवत म्हणाला पंढरपूरच्या वाटेने चाललात या वाटेवर असे भांबावून घाबरून चालणार नाही.
शून्यातुन सुरू झालेली ही गंगा पावलापावलाने वाढु लागली. पालखी पुण्याकडे निघाली. पुणे तेथे काय उणे ! पुणे तेथे सर्वच नवे असे हे पुणे. या पुण्याच्या मातीचा, या पुण्याच्या पाण्याचा, या पुण्याच्या हवेचा काय गुण असावा कोण जाणे ! परंतु जे पुण्यात पिकते तेेच महाराष्ट्रात ठेाक व किरकोळ भावात विकले जाते. इथे जे पिकत नाही ते इतरत्र पिकून विकेलच याची खात्री नसते. ही पालखी याला अपवाद नव्हती.
यावर दादा व राऊतांनी विचारविनिमय केला. पालखी ही समाजाची आहे आपणा दोघांची नाही पण तरीसुद्धा सुरूवातीला कोणीच सहकार्य करणार नाही. तेव्हा जो खर्च होईल तो दोघांनी निम्मा निम्मा सोसावा. आणि पालखी सुरू करताना येणार्या अडचणी यावर विचारविनिमय झाला. पालखीसाठी बैल, रथ व पालखी या गोळा करण्याची जबाबदारी दादांनी घेतली. पालखी मावळात एका खेडेगावात होती. बरडचे अर्जुनशेठ यांची गाडी पुण्यात आली होती.
‘‘ मी रत्नाकर भगत बोलतोय. हे बघा रात्री जो प्रकार घडला तो घडावयास नको होता. पण समाजाच्या विचाराला अनुसरून मला थांबावे लागले. आपण गेल्यानंतर रात्रभर मला या गोष्टीने चैन पडले नाही. यावर साधकबाधक विचार केला. रात्री मीही हिरिरीने बोलणे गरजेचे होते. याविषयी दिलगिरी व्यक्त करतो. रात्री आपण म्हणता त्या मार्गाने पालखी काढू. त्यासाठी कडक होण्याची तयारी आहे. उद्या सकाळी तुमच्याकडे येतो. ‘‘ दादा