Sant Santaji Maharaj Jagnade
पुणे महानगर पालिकेची सभा दि. 24 रोजी महानगर पालिकेत संपन्न झाली या महासभेत समजाचे सुपूत्र व मनपाचे उपमहापौर आबा बागुल यांनी कायदेशीर ठराव मंजुर करून घेतला या ठरवा द्वारे वसंत उद्यानात श्री संत संताजी महाराज जगनाडे यांचा पुतळा उभरण्यात येईल. श्री. संत संताजी पुण्यतिथी दरम्यान सलग तिन दिवस श्री संताजी महाउत्सव आयोजीत करेल. याच दरम्यान श्री संत श्रेष्ठ संताजी महाराजांच्या नावे परसकार दिला जाईल. या ठरावा मुळे पुणे महानगर पालिका स्वत:च्या खर्चान पुतळा, महोत्सव व पुरस्कार करेल.
धोंडिबा राऊत व दादा भगत यांचा आनंद गगनात मावत नव्हता. या पांडुरंगाच्या भेटीसाठी किती दिव्य केले. त्या दिव्याचे जे फळ आले ते फळ पाहुन त्यांना जसा आनंद होत होता तसेच पालखीबरोबर आलेले व इतर गोळा झालेले हरिभक्त आनंदी झाले होते.
![]()
‘‘ आपणास दशम्या हव्यात ना? माझ्याकडे काही आहेत. आपल्याला देऊ घ्या ? ‘‘ महाराज वाटले. त्यांनी त्यांचे पाय धरले. दशम्या देण्याविषयी विनंती केली. त्या वारकर्याने आपल्या गाठोड्यातून दशम्या काढुन राऊताकडे दिल्या. त्यांनी त्या दगडावर ठेवला. परत त्याचे पाय धरले. वारकरी राऊतांना थोपटत व उठवत म्हणाला पंढरपूरच्या वाटेने चाललात या वाटेवर असे भांबावून घाबरून चालणार नाही.
शून्यातुन सुरू झालेली ही गंगा पावलापावलाने वाढु लागली. पालखी पुण्याकडे निघाली. पुणे तेथे काय उणे ! पुणे तेथे सर्वच नवे असे हे पुणे. या पुण्याच्या मातीचा, या पुण्याच्या पाण्याचा, या पुण्याच्या हवेचा काय गुण असावा कोण जाणे ! परंतु जे पुण्यात पिकते तेेच महाराष्ट्रात ठेाक व किरकोळ भावात विकले जाते. इथे जे पिकत नाही ते इतरत्र पिकून विकेलच याची खात्री नसते. ही पालखी याला अपवाद नव्हती.
यावर दादा व राऊतांनी विचारविनिमय केला. पालखी ही समाजाची आहे आपणा दोघांची नाही पण तरीसुद्धा सुरूवातीला कोणीच सहकार्य करणार नाही. तेव्हा जो खर्च होईल तो दोघांनी निम्मा निम्मा सोसावा. आणि पालखी सुरू करताना येणार्या अडचणी यावर विचारविनिमय झाला. पालखीसाठी बैल, रथ व पालखी या गोळा करण्याची जबाबदारी दादांनी घेतली. पालखी मावळात एका खेडेगावात होती. बरडचे अर्जुनशेठ यांची गाडी पुण्यात आली होती.