Sant Santaji Maharaj Jagnade
![]()
नवीन नाशिक तेली समाज मंडळ आयोजित श्री संताजी महाराज पुण्यतिथी व विद्यार्थी गुणगौरव सोहळा शनिवार दिनांक ९/०१/२०१६ रोजी सायंकाळी ५ वा. प्रबोधनकार ठाकरे सभागृह स्वामी विवेकानंद नगर ,राणे नगर अंबड पो.स्टेशन मागे नवीन नाशिक येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे .
सकाळी १० वा. वोक्काहार्ट हॉस्पिटल तर्फे मोफत हेल्थ चेकअप व कुलस्वामिनी नेत्रसेवा यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात चेष्मा व मोती बिंदू शस्रक्रिया करण्यात येणार आहे सर्व समाज बांधवानी याचा लाभ घ्यावा
तेली समाजाची गेली 40 वर्षे विनामुल्य सेवा करणारे तेली गल्ली ह्रया तेली समाजाच्या मासिकाची ( तेली समाज वधुवर सुचक केंद्र, teli samaj vadhu var suchak kendra ) भव्य वधुवर पुस्तिका 2016 प्रसिद्ध होत आहे. तरी इच्छुक वर वधु व पालकांनी, इच्छुक उमेदवारांनी www.Teliindia.com या वेबसाईटवर आपल्या उपवर वधु-वरांचा फार्म भरावा. आपल्या ला हाजारो वधु-वरांची माहिती घर बसल्या मिळेल. अथवा
![]()
सर्व समाज बंधवाना कळवन्यात येते की दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी संत शिरोमाणी जगनाड़े महाराज यांच्या जयंती निमित्त दि.8/12 रोजी सकाळी 10:00 वा संगत रंग महल शहागंज औरंगाबाद मधे वहान रैली काढण्यात येत आहे आयोजक - संभाजीनगर जिल्हा, औरंगाबाद तिळवण तेली समाज औरंगाबाद शहर व ग्रामीण
९ फेब्रुवारी २००९ रोजी सोमवारला गोंदिया शहरातील धोटे बंधू विज्ञान महावद्यालयात भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्रातील तेली समाजाचे दैवत संत संताजी जगनाडे महाराजांच्या टपालतिकिटाचे विमोचन करण्यात आले.
महाराष्ट्रातील करोडो तेली समाजबांधवांची मागणी यावेळी पूर्ण झाली असली तरी या तिकिटाच्या प्रकाशनासाठी महाराष्ट्रातील तेली समाजबांधवांचे अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी दिसून येते. अनेक वर्षांची मागणी पूर्ण होताना संताजी महाराजांवरील तिकीट प्रकाशनापर्यंतची वाटचालीचा इतिहासही माहिती करून घेणे आवश्यक आहे.
विदर्भात तेली समाज जवळपास १९ टक्के आहे.
प्रस्थापित अन्यायाविरुद्ध संघर्ष करणार्या संत तुकारामाचा पट्टशिष्य असलेला संतू ऊर्फ संताजी जगनाडे यांचा जन्म ९ डिसेंबर १६२४ रोजी चाकण, जि. पुणे येथे झाला. त्यांचे मूळ आडनाव सोनवणे असून जगनाडे या टोपणनावाने ते जास्त प्रसिद्ध झाले. वडील विठोबा आणि आई मथाबाई यांची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. संताजीला शिक्षणासाठी घरीच व्यवस्था करावी लागली. लेखन-वाचन-अंकगणित याचेही व्यावहारिक शिक्षण संताजीला घरीच मिळाले.