भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
तेली गल्लीचे देशमाने :- कोणते देशमाने ? तेली गल्लीचे देशमाने हे समिकरण रूढ झालेले देशमाने म्हणजे एकखांबी तंबू ! शिक्षक असलेला हा माणूस सुट्टी व रविवार पाहुन प्रवास करून समाज पिंजला. निवडक सुयश अशा बातम्यांपेक्षा तैलिक प्रबोधनास सर्वोच्च प्राधान्य मुळात समाज सेवेची गोडी दिली वाईचे तत्कालीन सााजिक नेते कै. रामचंद्र मेरूकर यांनी मार्गदर्शन दिले. 1983 ला तेली गल्ली सुरू केले.
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
अशोक चौधरी :- धुळ्यात शिकुन नाशिकला स्थिर झालेले व आता पुर्ण नाशिककर झालेले अशोक चौधरींच श्रीमंगल कोणाला माहित नाही ? नाशिकधील सुशिक्षित व समाजभिमुख कार्यकर्ते एकत्र येऊन भरीव आर्थिक मदत म्हणजे श्रीग्रुप फाऊडेंशन स्थापन केले त्याचेच अपत्य म्हणजे श्रींमंगल मासिक
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
तेली समाज जागृतीकार पांडुरंग पिसे :- तौलिक प्रबोधनात सिंहाचा वाटा असणारे पांडुरंग पिसें बाबत जेवढे लिहावे तेवढे कमीच होईल. 1975 ते 2005 अशी तब्बल 30 वर्ष तेली बहुल म्हणजे विदर्भात तेली समाज जागृती हे मासिक अव्याहतपणे प्रकाशित केले चांदा टू बांदा असा उभा महाराष्ट्र पालथा घातला, 1999 मध्य स्नहीपुकार साप्ताहिकही काढले पुढे त्याचेच मासिकात रूपांतर झाले.
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
रामकृष्ण राठोड :- हे अकोल्याहून प्रगति नावाचे 4 पानाचे मासिक काढत मला आठवते 1964 साली मी 7 वी परीक्षा म्हणजे तत्कालीन फायनल परिक्षा पास झालो. भारत सरकारचा शिक्का असलेले पहिले प्रमाणपत्र आम्हाला मिळाले, या यशाची बातमी प्रगतित छापुन आली. त्यामुळे आम्हाला खुप आनंद झाला. त्या काळात प्रगति मासिक अवघ्या दहा रूपयात वर्षभर मिळत असे 2 नये पैसे तिकीट लावुन ते भारतात कुठेही पाठविता येत असे.
या वेळी श्री. शंकर सारडा, शहिद डॉ. नरेंद्र दाभोळकर, बाबुराव घोरपडे, एन. जी. गायकवाड, कॉ. रणजीत किर्वे मान्यवर उपस्थीत होते. सायगावच्या मोहन देशमाने यांनी आपली नोकरी संभाळत मासिकाची मुळे खोलवर रूजवली. प्रबोधन रचना व संघर्षया माध्यमातुन समाज मन घडविण्यास हे मासिक आधारस्तभ ठरले आहे. गत 33 वर्षात वधुवरांना मोफत प्रसिद्ध दिली जाते