Sant Santaji Maharaj Jagnade संत तुकाराम श्रिमंत घरात जन्मले होते. दुष्काळ हा पैसे कमविणयाची महान संधी आसते. त्या संधीचे सोने करण्यापेक्षा त्यांनी आपली धान्याची कोठारे दुष्काळ ग्रस्तांना दिली. याही पुढे जाऊन तुकोबांनी नक्की काय करावयाचे याचे चिंतन करून आपल्या वाट्याला येणार्या सावकारी कागदपत्रे नदीत फेकुन कर्जदारांना कर्ज मुक्त केले. या दोन गोष्टी तुकोबा व संताजी एक होण्यास कारणीभुत ठरल्या आहेत.
संत तुकारामा सह संत संताजींनी जी सामाजीक, धार्मिक क्रांती केली. त्या क्रांतीच्या इतिहासाच्या पाना पानावर संताजींचे नाव कोरले आहे. वेद, स्मृती, श्रुती, पुराणे, मिताक्षरी या हिंदु धार्मीक धर्म ग्रंथांना ही लाज वाटेल इतके प्रबळ अभंग तुकोबांचे आहेत. ही वास्तवता अनेक विद्वान मान्य करतात. आणी या वरिल धर्मग्रंथांना ही फटकारताना असेच तुकोबाचे अभंग आहेत. हे लेखन फक्त तुकोबाचे आहे. हे काही बाबतीत मान्य आहे. काही बाबतीत या साठी की पंडीतांनी मोडीचे रूपांतर देवणागीरीत करीताना काही बदल ही केलेत.
होता संतु म्हणुन वाचला तुका, तुकोबांच्या चौदा टाळकर्या पैकी एक टाळकरी संत संताजी संत तुकोबा गाथा पालन कर्ते म्हणजे संत संताजी. मी सुद्धा वरिल समजत होतो. पण संत संताजी सर्व दिशांनी जेंव्हा समजुन घेऊ लागलो तेंव्हा मला संत संताजी वरिल पद्धतीने मांडणे हेच मुळात त्यांच्यावर फार मोठा अन्याय करण्या सारखे आहे. हे माझेच मला समजुन आले. संत संताजी पुर्ण समजले नाहीत पण जे समजले संभाळले व वाटले सुद्धा. त्या शब्दांच्या शस्त्राने पुढे शेकडो वर्ष माणसाला जगता येऊ लागले. पण ही संत संताजींनी संभाळलेली शस्त्रे आज आपणच त्यांना दुर लोटत आहोत. तेंव्हा पुन्हा एक वेळ संत संताजी समजुन घेऊ.
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
रमेश आंबेकर :- हे मिलकमगार होते. मिल बंद झाल्यावर अमरावतीला स्थिरावले सामाजिक ऋण हे मासिक अनेक वर्ष प्रकाशित करन समाजप्रबोधन केले.
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
चाळीसगावचा गोरख चौधरीचा संताजी दरबार पत्र्याच्या घरात राहन महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाचा तेली समाज प्रबोधनासाठी कार्य करणारा चाळीसगावचा गौरख चौधरी हा एक आदर्श तरूणकाळी वर्ष संताजी दरबार प्रकाशित करून समाजाचे प्रबोधन केले पुढे ते बंद पडले.