Sant Santaji Maharaj Jagnade अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांच्या विशेष शैक्षणिक सुविधा बंद कराव्यात अशी तरतूद राज्य सरकारने नवीन शैक्षणिक धोरणातील मसुद्यात केली होती. विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी या वर टीका केल्यामुळे राज्य शासनाने अनुसूचित जाती व जमाती बाबतच्या तरतुदी त्या मसुद्यातून वगळल्या आहेत.
ओबीसींच्या भरवशावर आपण राज्याचे मुख्यमंत्री झालात याचेही आम्हाला अभिमान वाटत होते. परंतु वर्ष लोटूनही विरोधी पक्षात असताना ज्या ओबीसींसाठी आपण आक्रमकपणा घ्यायचे त्या ओबीसी समाजाच्या एकही विषयाला अद्यापही हात घातला नाही. यावरून आपण ओबीसी समाजाचा वापर मतासाठी तर केला नाही ना असे वाटू लागल्याचा उल्लेख ही पत्रात केला आहे.
लोकशाहीत आपण राजकारणा पासुन दूर राहू शकत नाही. लोकशाहीत आपण समाज कारणा पासुन दुर राहू शकत नाही याच मुळे श्री. सुरेश पितळे व सुभाष गर्जे यांचा संबंध आला. त्यामुळे राजकीय क्षेत्रात संबंध येऊ लागले. सत्ता स्थान व समाजसेवा याची ओळख झाली. यातुनच भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, मा. पंतप्रधान चंद्रशेखर, माजी उपप्रधान यशवतंराव चव्हाण, जाणता राजा मा. शरद पवार यांच्या संपर्कात ते अनेक वेळा आले.
पुणे :- लोकसभा निवडणुकी पुर्वी महाराष्ठ्राच्या तेली समाजाचे पालनकर्ते, सरंक्षण कर्ते, उद्धार कर्ते म्हणुन मिरवणार्या बर्याच कर्त्या मंडळींनी बारामतीकरांच्या मराठी- कुणबी यावाटचालीला लाथ न मारता. त्या विषयी आजपर्यंत कुठे साधा विरोध न करता मोदीचे तेली जन्मावर निष्ठा ओतुन नागपुरच्या ब्राह्मण शाहीला आपले माणुन मोदींना 12 टक्के समाजाचा जाहिर पाठिंबा दिला. मागणी काहीच नाही, अटी काहीच नाही. समाजाला काही देऊ नका. पण तुम्ही तेली अहात मग आमचा तुम्हाला पाठिंबा देऊ केला होता. पदरात काय तर शुन्य यापासुन काहीच न शिकलेले जे आहेत तेच आमचे कर्ते करवीते आहेत. एक खासदार, तिन आमदार व एक मंत्री या तुकड्यावर समाधान राहुन. मागील प्रमाणेच एका नव्या आणिबाणीला रूजवण्याचे शिल्पकार आहोत की नाही हे आता काळ ठरवत आहे.
सदर कार्यक्रमाची सुरवात श्री संताजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली या कार्यकमाच प्रमुख पाहुणे मंबई हायकार्टाचे वकील अॅड. विपीन कामडी हजर होते. तसेच सहाय्यक पुरवठा अधिकारी सौ. रोहणीताई शिंदे, पी.एस.आय. शिंदे मॅडम नगरसेविका सौ. आश्विनीताई जाधव नगरसेवक श्री. गोपाळजी तिवारी, अभयजी छाजेड, प्रियाताई महिंद्रे, संताजी प्रतिष्ठाणचे कोथरुड अध्यक्ष श्री. रत्नाकर दळवी डॉ. मयुर क्षीरसागर इ. मान्यवर हजर होते.