सदर कार्यक्रमाची सुरवात श्री संताजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली या कार्यकमाच प्रमुख पाहुणे मंबई हायकार्टाचे वकील अॅड. विपीन कामडी हजर होते. तसेच सहाय्यक पुरवठा अधिकारी सौ. रोहणीताई शिंदे, पी.एस.आय. शिंदे मॅडम नगरसेविका सौ. आश्विनीताई जाधव नगरसेवक श्री. गोपाळजी तिवारी, अभयजी छाजेड, प्रियाताई महिंद्रे, संताजी प्रतिष्ठाणचे कोथरुड अध्यक्ष श्री. रत्नाकर दळवी डॉ. मयुर क्षीरसागर इ. मान्यवर हजर होते.
नाशिक मालेगांव :- शासकिय सेवेत राहुन समासेवा हा श्वास बनलेल्या कर्चचार्याची सेवा सदैव स्मरणात राहते. मालेगाव बीएसएनएलची सेवा ग्राहकाभिमुख करण्यात रमेश उचित यांचा सिंहाचा वाटा आहे. मालेगावची साहित्य चळवळ त्यांच्यामुळे गतीमान झाली. मालेगावकर त्यांच्या सेवेची जरूर नोंद ठवतील असे उद्गार महाराष्ट्राचे सहार राज्यमंत्री दादाभाऊ भुसे यांनी काढले.
चिंचवड :- ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र या बिगर राजकीय संघटने तर्फे हे साहित्य संमेलन 4 ऑक्टोबर 2015 रोजी सकाळी 9.30 ते सायं 7 वाजेपर्यंत चैतन्य सभागृह चिंचवड येथे संपन्न होईल. ओबीसी समाजाचा संस्कृतीक शोध, ओबीसींवर होणारा अन्याय या बाबत विचार प्रकट केले जातिल.
नसरापुर - येथील ग्रामपंचायत निवडणुकीत डॉ. गणेश हिवरेकर निवडून आले होत. या वेळी सरपंच पद ओ.बी.सी. राखीव असल्याने त पदाचे हाक्कदार होते. त्यामुळे सरपंच पदाच्या निवडणुकीत ते विजयी ही झाले. तेली समाजाचे सरपंच असने ही या गावची परंपरा खंडीत झाली होती ती त्यांनी पुन्हा सुरु केली. डॉ. गणेश यांच वडील कै. वामनराव हिवरेकर यांनी बरेच वर्ष सरपंच भुषवले आहे. त्यांच्या निवडीबद्दल श्री. प्रकाश कर्डीले माजी अध्यक्ष तिळवण तेली समाज पुणे यांनी अभिनंदन केले आहे. सर्वातर्फे अभिनंदन.
याप्रसंगी जाणिव पुरस्कार विजते प्रा. वसंतराव कर्डीले म्हणाले की, भारतात 6500 जाती असल्या तरी सर्व जातीचा ओबीसी हा कणा आहे . पुर्वी त्याची संख्या 52 % होती. आज ती 65 % च्या पुढे आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसी सत्ताधारी होऊ शकतात. मात्र त्यांच्यात एकजुट नाही. तसेच राजकीय जागृती नाही. 1902 मध्ये छत्रपती शाहु महाराजांनी ओबीसीसाठी 50 टक्के प्रथम आरक्षण दिले. 1928 साली सायमन कमिशनपुढे श्येडुल्ड कास्टची यादी आंबेडकरांनी दिली तर श्येडुल्ड कास्टची यादी ठक्कर बाप्पांनी दिली.