Sant Santaji Maharaj Jagnade
( टीप :- श्री. संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ हा इतिहास श्री. धोंडिबा राऊत यांनी मला सांगितला तसा शब्दांकन केला. याचा पडताळा पाहण्यास वेळ अपुरा होता. या बाबत शंका असतील तर त्या पालखी मंडळांशी संपर्क साधून निरसन कराव्यात. सन १९८९ ) :- श्री. मोहन दत्तात्रय देशमाने
![]()
सर्व संतात तुकोबांना आपण कळस चढविला म्हणतो. तुकोबांचे अभंग माहीत नाहीत किंवा ऐकले नाहीत असा एकही मराठी माणूस सापडणार नाही. ही महाराष्ट्राची अनमोल ठेव आहे. या ठेवीवरच येथील समाज जीवन उभे आहे. ही ठेव प्राणपणास लावून जपणारे महान पुरूष म्हणून आपण संताजी महाराजांना ओळखतो इतिहास आपल्या पानावर हेच नमुद करत आहे. परंतु काही काळ असा होता की, सुदुंबरे या गावात एक पडकी समाधी हीच फक्त आठवण होती.
![]()
तिळवण तेली समाजातील समाजहिताच्या गरजा लक्षात घेऊन पुणे जिल्हा कार्यक्षेत्रात आज दि. ५/७/२०१५ चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर पुणे येथे श्री. रमेश भोज यांच्या अध्यक्षतेखाली श्री. विजय रत्नपारखी, सौ. राधिकाताई मखामले, श्री. दिलीप शिंदे, श्री. संतोष व्हावळ, श्री. प्रीतम केदारी, श्री. महेश अंबिके, श्री. गणेश चव्हाण, श्री. अनिल उबाळे, श्री. राजू हाडके, श्री. संदीप चिलेकर, श्री. सचिन काळे, श्री. सूर्यकांत बारमुख यांनी एकत्र येऊन विचरविनिमय करून नवीन संघटना स्थापना करण्याचे एकमताने ठरविले.
![]()
श्री. अरविंद रामचंद्र रत्नपारखी (गुरूजी) कोथरूड पुणे.
तुझ्या वडिलो वडीली निर्धारी I चालविली पंढरीची वारी II
त्यासी सर्वथा अंतर न करी I तरीच संसारी सुफळपणा II
प्रत्येक काम वेळच्या वेळी करणारे शिस्तप्रिय असे आमचे वडील श्री. रामचंद्र महादेव रत्नपारखी (तेली गुरुजी).”येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो I हा होईल दान पसावो II येणें वरें ज्ञानदेवो I सुखिया झाला...II” हा त्यांच्या रोजच्या नित्यकर्मातील ज्ञानेश्वरी वाचनानंतरचा पसायदानाचा समारोप अजूनही कानात घुमतो आहे.
![]()
जगद्गुरू तुकाराम महाराज मुळ गाथेचे लेखनकर्ते
सदुंबरे, श्री क्षेत्र देहु नजीक, ता. मावळ, जि. पुणे
सौजन्य
श्री. मुकूंद अमृतराव चौधरी
कार्याध्यक्ष :- मुंबई महानगर, महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा
श्री. दयाराम हाडके
ज्येष्ठ समाजसेवक
श्री. दिलीप खोंड
संघटक तेली समाज
![]()
श्री. अरविंद रामचंद्र रत्नपारखी (गुरूजी) कोथरूड पुणे.
माझ्या कल्पने प्रमाणे श्री संताजी पालखी सोहळ्यात खालील गोष्टींची पुर्तता करण्यासाठी आपण सारे एकत्र येऊया.
१) आपल्या सर्वांच्या सहकार्याने सर्व दिंड्याचा मुक्काम एका ठिकाणी व्हावा अशा मुक्कामाच्या जागा मिळवणे.