Sant Santaji Maharaj Jagnade
प्रकाश लोखंडे, अ. नगर
![]()
या वेळी देश पातळीवरील तैलिक महासभेची सह विचार सभा सुरू झाली या सभेला महाराष्ट्रा सह देश पातळीवरील समाज बांधव प्रथमच नगर येथे आले होते. सभेची सुरूवात झाल्या नंतर देश पातळीवर अध्यक्षांची निवड सुरू झाली. या वेळी सर्वानुमते कै. केशर काकुची निवड अध्यक्षा म्हणुन झाली. भोजना नंतर रिक्त झालेल्या महाराष्ट्राच्या अध्यक्षांची निवड करावयाची होती. काकू, रायपुरे यांनी माझ्या सह एक दोन जना बरोबर चर्चा केली. असंघटीत समाजाला संघटीत करू शकणारा संघटक वृत्तीचा अध्यक्ष हवा आसे सुजान बांधव आमदार रामदास तडस यांच्या शिवाय कोणच नव्हते. आणि या सह विचार सभेत सर्वा समोर हा विषय ठेवला आसता सभेने एक मताने मा. रादास तडस यांची निवड महाराष्ट्राच्या अध्यक्ष पदी केली. या वेळी मा. सौ. प्रिया महिंद्रे, कै. नंदु क्षिरसागर, श्री. अशोक काका व्यवहारे, श्री. अंबादास शिंदे व इतर मान्यवर उपस्थीत होते.
![]()
- प्रकाश कर्डीले, मा. अध्यक्ष, तिळवण तेली समाज पुणे.
समाज उभा आसतो संघटनेवर संघटना आसते कार्यकर्त्यांच्या बळावर कार्यकर्ते आसतात नेत्याच्या नेतृत्वावर जर समाज संघटीत हवा असेल तर कार्यकर्ते हवे असतात. या कार्यकर्त्यांना संघटीत करणारा व ठेवणारा नेता तेवढाच खंबीर असावा लागतो. याचा जीवंत अनुभव म्हणजे खासदार रामदासजी तडस साहेब आहेत. अहमदनगर येथे अध्यक्ष पदाची जबाबदारी येताच ते आपल्या पदाला न्याय देऊ लागले.
सौ. मंगल जाधव महिला आघाडी महाराष्ट्र
![]()
मला आठवतो त्यांचा दोन वर्षापुर्वीचा वाढदिवस त्यांनी त्यांच्या गावी वर्धाजवळ, ठेवला होता त्या निमित्त प्रांतिक महासभेची मिटींग व त्यांच्या गावात सामाजिक कार्यक्रम अयोजित केला होता खुप चोख व्यवस्था केली होती.
मेहनत सचोटी व माणुसकी हे गुण त्यांच्या त्या दिवसभराच्या कार्यक्रमात दिसुन आले ही त्यांची तत्व त्यांच्या यशाच बळ आहे.
शिवाजी क्षिरसागर, अध्यक्ष सेवा आघाडी
![]()
माझी सर्व नोकरी पोलिस खात्यात गेलेली अनेक जबाबदार्या पेलताना माणुस वाचता आला, माणुस समजला. माझा समाज तेली, मी एक तेली ही भावना जीवनभर जपलेली. या वाटेवर तेली महासभा भेटली, मा. खासदार तडस साहेब भेटले. रामदासजी हे एक पैलवान पैलवान हे जरा तापट आसतात. पण विदर्भ केसरी असलेले हे बांधव अतिशय शांत स्वभावाचे मला त्यांच्या जवळ वावरता आले व काम ही करता येते हे त्यांचे वैशिष्ठ.
रमेश सदाशिव भोज
आपल्या झंझावती शैलीचा ठसा उमटविणारे रामदासजी तडस साहेब होय आम्ही त्यांना साहेबच म्हणतो कारण ते आमचे अगोदरही साहेबच होते आताही आहेत आणि भविष्यात अनंत कालापर्यंत साहेबच रहाणार आहेत. हे अगदी त्रिवार सत्य आहे. कारण पुर्वीनपासुनच त्यांचे आशिर्वाद आमच्या पाठीशाी आहेत. ते आपल्या समाजात जन्मले हे आपल्या समाजाचे भाग्यच म्हणावे लागेल, त्यांचा परिसस्पर्शा समाजाला झाला आणि संपुर्ण तेली समाजाचे भाग्यच उजाळले असे म्हणण्यातकाहीच वावगे ठरणार नाही. स्वत:च्या बुद्धीमत्तेच्या जोरावर सर्वच क्षेत्रात उत्तम प्रकारे कार्य करून अनेक समाज बांधवांना त्यांनी सर्व प्रकारची मदतच केली आहे. त्यांच्यामुळेच आपल्या तेली समाजाचे नाव संपुर्ण देशात सध्यातरी निघत आहे. यांच्यामुळेच आपला समाज नावारूपाला आलेला आहे. त्याचे कारण म्हणजेच साहेबांचे आपल्या समाजावरील प्रेम त्यांचे आशिर्वाद त्यांचे सहकार्य.