Sant Santaji Maharaj Jagnade साई बाबा यांच्या पाद स्पर्शाने पुनीत झालेल्या शिर्डी नगरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच "डॉ. मेघनाद साहा" यांची पुण्यतीथी अ. नगर जिल्हा तेली समाज महासभा व राहता तालुका तेली समाज महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी साजरी करण्यात आली .
जिल्ह्यातील सहा तालुके आणि मुळशी तालुक्यातील कासारसई गांवातील समाजबांधव कार्यकर्ते यांचे सहकार्याने कुटुंब परिचय पुस्तिका तयार झालेली आहे.समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली. समाजबांधवांचे ऋण व्यक्त करुन यापुढेही समाजसेवेसाठीशनीमहाराजांची व संताजी महाराजांची क्रुपा लाभावी असे विचार मा. श्री. चंद्रकांतशेठ वाव्हळ पुणे जिल्हाध्यक्ष यांनी प्रास्ताविकातुन मांडले.
नाशिक :- २१ व्या शतकातील भारताच्या भवितव्याबद्दलचा दृष्टिकोन मांडतांना माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम व मा. पंतप्रान नरेंद्रजी मोदी यांनी सांगीतले की २०२० ते २०३० मध्ये भारतदेश वयाने २८ वर्षाचा होणार आहे. तर लंडन अमेरीका आर्यलंड व युरोपियन देश ४५ वयाचे होणार आहेत. या क्रातीकारी दशकात सुसंस्कृत उच्च विद्याविभुषीत पिढी भारतात येत आहे. आपल्याला ट्रान्सफर व्हायचे आहे. या क्रांतीमध्ये जायचे आहे. म्हणुननच इंग्रजीवर प्रभुत्व असणारी पिढी घडवायची आहे.
आशा जागृत तालुक्याची जबाबदारी श्री. ज्ञानेश्वर दुर्गुडे श्री. किसनराव अवसरे, बळीराम धोत्रे यांच्याकडे आली. श्री. दुर्गुडे यांनी तालुक्यातील परंपरेला साजेसे कार्य सुरू केले. सलग दोन वर्ष विद्यार्थी गुण गौरप समारंभ घेऊन संघटन जिव्हाळा निर्माण केला. या बळावर ते खाने समुरी करू लागले.
सत्यवान शेठ कहाणे हे एक वयाची ७५ वर्षांची वाटचाल पुर्ण करणारे घरातील कै. वसंतराव, श्री. शशीकांत, श्री. मुरलीधर यांना बरोबर घेऊन उद्योगात उभे राहिले. भुसार माल ठोक व करकोळ विक्री करू लागले यातुन ऑईल मिल व इतर व्यवसायात आपला ठसा उमटवला. संघटन, समाज सेवा, त्याग कमावर निष्ठा ही आपली विचार ठेवण निर्माण केलेले बांधव, मंडल आयोगाची राखीव जागा मिळण्याच्या कामा पुर्वी ते खेडगावच्या ग्रामपंचायत सदस्यपदी निवडूण गेले. सामान्य माणसासाठी धडपडणे, त्यांचे प्रश्न सोडवणे त्या साठी प्रसंगी संघर्ष करणे ही प्रणाली वापरली त्यातुन आपला ठसा उमटवला यामुळे खेड तालुक्यातील राजकीय क्षेत्रात आदराचे स्थान निर्माण झाले. या मुळे ओबीसी असुनही राजकीय मडळींना त्यांची नोंद घ्यावी लागली. यातुनच पुणे जिल्हा परिषदेवर स्विकृत सदस्य म्हणुन निवड झाली. खेड व इतर जिल्हा तालुक्यांच्या आर्थिक विकासाची बांधीलकी स्विकारून उभ्या राहिलेल्या राजगुरनगर सहकारी बँकेत ते संचालक म्हणुन निवडून आले या बँके द्वारे गरजुनां व प्रामाणीक खातेदारांना सहकार्याचा केंद्र बिंदु त्यांनी मांडला त्यामुळे ते या बँकेच व्हाईस चेअरमन ही काही वर्ष होते. निष्ठा त्याग व धडपड जवळ असल्याने हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या डायरेक्टर बोर्डावर ही ते काम करीत होते.