Sant Santaji Maharaj Jagnade
महाराष्ट्राची धन दौलत भवानी माता संभाळणारे भगत घराणे होते. त्याच घराण्याचे केशवराव वंशज,. ते पुण्याच्या इतिहासातील पहिले तेली नगराध्यक्ष होते ते ही सन १९३५ -३६ साली. केशवराव सामाजीक जाणीव असलेले बांधव होते. रावसाहेब केदारी यांच्या नेतृत्वाखाली सन १९१९ पासून सुदुंबरे येथे श्री संत संताजी महाराजांची पुण्यतीथी सार्वजनिक रीत्या सुरू होताच त्यात ही ते सामील झाले. कै. आप्पासाहेब भगतांची इच्छा होती. त्यांचे मत होते की आपल्या समाजाला एक विचारांची बैठक आसावी या साठी आपण प्रयत्न करू या त्यांच्या इच्छे खातर कै. अप्पासाहेबांनी भवानी पेठेतील आपली वास्तु समाजाला दिली. ती काही दिवसात समाजाच्या नावे रितसर ही केली.

दामु धोत्रे हा चार अक्षरांचा आकाशाएवढा माणूस या देशात जन्मास येणे ही या देशाच्या भाग्याची गोष्ट. भारताच्या लोकसंख्येत मूठभर असलेल्या तेली समाज. समाजात जन्म घेणे ही या समाजाची अभिमानाची बाब.
माझे काळीजी कुरतडत गेले, जेव्हा दामू धोत्रे हा माणूस माझा आहे हे समजले तेव्हा. शाळेत पाठ्यक्रमात असलेल्या धड्यातून दामू मुलांना - विद्यार्थ्यांना मी शिकवीत होतोच समाजाच्या इतिहासात संताजी महाराज व गंगू तेलीण ही फक्त ठेव. यांची ठेव तर किती अपुरी ! जेव्हा आपले म्हटले तेव्हा शोधाशोध करून मिळविली त्या माणसाच्या नावाभोवती इतिहास आहे ही समाजाच्या अभिमानाची बाब. ती आम्ही उशीरा का होईना जपतोय.

शेलार सर्कस ही या देशाची शान ठरली. कै. तुकाराम शेठ हे धडपडे व धडाडीचे शुन्याचे विश्व केले. पैसा किर्ती मिळविले पण ते विसरले नाहीत सर्वसामान्यांना अनेक संस्थांना त्यांनी देणग्या व खेळ दिले. सर्कस १९१९ मध्ये नागपूर येथे होती. त्यावेळी समाज परिषद होती. या परिषदेला मदत म्हणुन एक दिवसाचे उत्पन्न देवून टाकले. १९२३ मध्ये समाजाने त्यांना अध्यक्ष पद देवून गौरविले व मानपत्र दिले. मुंबई येथे खेळाच्या निमित्ताने बांधवांना बोलवून संघटनेचा मंत्र दिला.
वधु वर मेळावे काळाची गरज हा ही विचार अस्तीवात नव्हता तेंव्हा गणेश पेठेतील पांगुळ आळीतील शेलार वाड्यात कै. शंकरराव भाऊसाहेब कर्डीले रहात होते. तेव्हा पुण्याच्या प्रत्येक पेठेत समाज रहात होता प्रत्येकाच्या सुखात दु:खात समाज बांधव सामील होत होते बाहेरून आलेला समाज बांधव या प्रवाहात सामील होत आसे. कर्डीले तसे समाज विचाराचे आपले घर पाहुन ते ८२ भवानी पेठे येथे रोज जात. आजुबाजुच्या गावात ८२ पेठ मध्ये ही लग्न असेल तर हजेरी लावत. मग पत्रिका असो अगर नसो समाज लग्नातुन ते उपवर वधु वर शोधत.
आशा बिकट परस्थितीत त्यांनी अध्यक्षपद स्विकारले. धर्मकारण व समाजकारण ही विचाराची बैठक पुर्वजांनी निर्माण करून वाढवलेली तीच पद्धत सुरू ठेवली राजकारण, अर्थकारण व समाजाकरण ही तेली महासभेची बैठक. या दोन्ही समाज संस्थेत समन्व्य साधुन जो सर्वाचा सर्वगटांचा, सर्व पक्षांचा म्हणजे समाजाचा भव्य महामेळावा झाला. तो यांच्याच काळात. स्वागताची, महाप्रसादाची जबाबदारी संस्थेकडे आली. लाखो बांधव एकाच वेळी पुण्यतिथीला येणे हा इतिहास घडवायचा होता.