Sant Santaji Maharaj Jagnade त्यांनी प्रथम सामुदाईक विवाह सुरू केला यातील अडचनीला सामोरे जाताना वधु-वर मेळावा ही संकल्पना पटली. आगदी पुणे जिल्हा व सातारा, नगर, नाशीक, रायगड मुंबई येथे घरोघरी जावुन संकल्पना पटवून देऊन मेळाव्यात सहभाग वाढवला. एक पुणेकर काय करू शकतात हे सर्वांना पटले गेले.
महाराष्ट्र प्रांतीक तेली महासभा बैठक :- सांगली जिल्ह्याचे डॉ. संजय गताडे यांनी सांगीतले की, तालुका व जिल्हा पातळीवर सामाजाची संपर्क कार्यालये असावीत तेथुन सर्वसामान्य समाजबांधवास देखील महाराष्ट्रात कुठेही पदाधिकार्यांशी संपर्क साधता यावा. समाजाने हायटेक व्हावे.
तळेगाव दाभाडे :- साहित्य कला आणि सांस्कृतीक मंडळाचे विश्वस्त व अध्यक्ष व जेष्ठ कवी श्री. सहदेव मखामले यांच्या पाचव्या काव्य संग्रहाचे प्रकाशन शनीवार दि. ११/४/२०१५ रोजी डॉ. राम मनोहर लोहिया समाजवादी विद्यापीठ कोलकर कॉलनी तळेगाव दाभाडे येथे सायंकाळी ५.३० वाजता संपन्न होत आहे.
राज्यस्तरी भव्य वधू-वर-पालक परिचय मेळावा,
पुणे स्थळ - गणेश कला क्रीडारंगमंच, स्वारगेट, पुणे
वेळ - शुक्रवार दि. 1 मे 2015 सकाळी 10 ते सायं. 6 पर्यंत.
झी वाहिनीवरील सायंकाळी ७.३० वा. कन्यादान ही मालिका सुरू झाली आहे. दिनांक १०/३/२०१५ ते १२/०३/२०१५ रोजी या मालिकेतील नावे कलाकार श्री. सदाशिव किर्तने व नंदकुमार तेली यांच्यामध्ये संवादात श्री. नंदकुमार तेली हा भ्रष्टाचारी आहे व मी त्याच्या हाताखाली काम मुळीच करणार नाही हे वाक्य श्री. सदाशिव किर्तने बोलण्यात आले आहे. सदर मालिकेचे दिग्दर्शक श्री.गौतम कोळी आहेत. खरे पाहता कन्यादान या मालिकेत वरील संवाद हे तेली समाजाबद्दल बोलण्याचे दाखविण्यात आल्यामुळे दिनांक १७/०३/२०१५ रोजी श्री. विलास त्रिंबककर (अध्यक्ष मुंबई विभाग, महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज), श्री. सतिश वैरागी (अध्यक्ष कोकण विभाग महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज),