Sant Santaji Maharaj Jagnade
छत्रपती संभाजीनगर, दि. १५ - अखिल भारतीय तैलिक महासभा, नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर येथील मनोज संतान्से यांची अखिल भारतीय तैलिक साहू महासभेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली. राष्ट्रीय महासचिव रामलाल गुप्ता यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले.
धुळे - महिलांनी सक्षम बनून स्वसंरक्षणा बरोबरच समाजाच्या रक्षणासाठी पुढे यावे असे प्रतिपादन धुळे महापालिकेच्या महापौर सौ. प्रतिभाताई चौधरी यांनी केले ते खान्देश तेली समाज मंडळ आयोजित कराटे प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. साक्री रोड वरील कल्याण भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री एस. के. चौधरीसर हे होते
सोनई: संगमनेर येथील उद्योजक व महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभेचे नाशिक विभागीय उपाध्यक्ष प्रदीप करपे यांना उंबरे येथील श्री छत्रपती प्रतिष्ठानाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कारवितरण रविवारी (ता. ९) सायंकाळी ४ वाजता उंबरे येथील श्री हनुमान मंदिर सभागृहात होणार आहे.
समाजातील महिलांना व्यापारासाठी एक भव्य व्यासपीठश्री संताजी बिझनेस फोरम, नाशिक द्वारा आयोजित व्यापार-व्यवसाय महोत्सव दि. ८ व ९ एप्रिल २०२३ रोजी स. १० ते रात्री १०.३० वा. यशवंत मंगल कार्यालय, राजस्वीट समोर, दिंडोरी रोड, नाशिक मध्ये आयोजित केले जाणारे आहे.
शिर्डी - आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स श्री साईबाबा सेवा संस्थान शिर्डी तसेच अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अँड. डॉ. विक्रांत वाघचौरे यांना विधी क्षेत्रात, धार्मिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले, यावेळी आंतरराष्ट्रीय मानवधिकार असोसीएट्स