Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

पिंपरी चिंचवड शहर तेली समाज श्री संत संताजी महाराज जगनाडे जयंती

     श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती ८ डिसेंबर २०१९ रोजी साजरी करण्यात येत आहे. यावर्षी प्रथमच राज्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयात शासन आदेशानुसार जयंती साजरी करण्यात येणार आहे. पिंपरी -चिंचवड शहरात महापालिकेच्या वतीने प्रथमच दिनांक ८/१२/२०१९ रोजी सकाळी ठिक १०.०० वा. महापालिकेच्या मुख्य कार्यालयात पिंपरी येथे तळमजल्यावर जयंती साजरी करण्याचा कार्यक्रम आयोजीत केलेला आहे.

दिनांक 06-12-2019 14:44:58 Read more

तुकाराम गाथेचे लेखक संत संताजी जगनाडे महाराज

संत संताजी जगनाडे महाराज जयंती विशेष लेख

Tukaram Gatha Writer Sant Santaji Maharaj Jagnade        संत संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील चाकण या गावी ८ डिसेंबर १६२४ रोजी झाला. संताजींचे वडील विठोबा यांचा परंपरागत असा धान्यापासून तेल गाळून ते विक्री करण्याचा व्यवसाय होता. संताजींचे कुटुंब वारकरी संप्रदायाचे पाईक होते. घरात वंशपरंपरेने पंढरपूरच्या विठोबाची वारी अखंडित होती. घरातच ग्रंथांचे वाचन, पारायणे चालत. तसेच कीर्तन, प्रवचन यांना उपस्थित राहण्यात खंड नसे. हे सर्व संस्कार संताजींवर झाले. तत्कालीन परंपरेनुसार अगदी बाल वयातच विवाह होत असत. संताजींचा विवाह त्यांच्या वयाच्या ११ व्‍या वर्षी खेडच्या कहाणे घराण्यातील यमुनाबाई यांच्याशी झाला.

दिनांक 06-12-2019 13:54:05 Read more

समतेची शरण चळवळ आणि महात्मा बसवेश्वर

    प्राचीन भारताचा इतिहास जितका समृद्ध आहे, तितकाच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात दक्षिण भारताचा इतिहास समृद्ध आहे.  मध्ययुगीन बारावे शतक हे परिवर्तनाचे शतक मानले जाते. आजपासून 900 वर्षांपूर्वीची सामाजिक परिस्थिती खूप बिकट होती. माणूसच माणसाचा गुलाम बनला होता. मराठी कष्ट न करता फुकट खाणारा वर्ग समाजात वाढत होता. कष्ट करणारे अठरा आलुतेदार आणि बारा बलुतेदार कष्ट करत होते.

दिनांक 14-07-2019 01:51:36 Read more

मावळ तालुका तेली महासभा आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ

           मावळ तालुका तेली महासभा आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ (इ.१० वी / १२ वी.)  रविवार दि. ०७/०७/२०१९ रोजी दुपारी ३.०० वा. नाना नानी पार्क, भंडारी हॉस्पिटलसमोर, तळेगाव दाभाडे ता.मावळ, जि.पुणे येथे आयोजित करण्यात आलेला आहे. सर्व समाज बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, ही नम्र विनंती करण्‍यात आलेली आहे  प्रमुख पाहुणे श्री. चंद्रकांतशेठ वाव्हळ (विभागीय अध्यक्ष, पुणे विभाग)

दिनांक 03-07-2019 13:41:59 Read more

श्री शनि मारुती मंदिर इंदोरी पदाधिकारी

        श्री शनि मारुती मंदिर इंदोरी प्रथम वर्धापन दिन  11 मे  2019  वार  शनिवार असून नियोजनासाठी दिनांक 4 मे 2019 रोजी बैठक आयोजित केली होती त्यामध्ये पुढील कालावधीसाठी श्री शनि मारुती मंदिर देवस्थान ट्रस्ट इंदोरी च्या अध्यक्षपदी -श्री सचिन नथुराम अवसरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली पुढील कार्यकारणी खालील प्रमाणे  श्री जयंत सूर्यकांत राऊत कार्याध्यक्ष , श्री प्रशांत चंद्रकांत भागवत उपाध्यक्ष

दिनांक 20-06-2019 23:55:37 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in