तैलिक समाजाचे आराध्य दैवत संत जगनाडे महाराजांची जयंती मंत्रालय व सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसे परिपत्रक २६ डिसेंबरला सामान्य प्रशासन विभागाने काढले आहे. या निर्णयामुळे तैलिक समाजात उत्साहाचे वातावरण असून, समाजबांधवांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.
इ. स. १७७५ ते १७९० या कालावधीत महीपतीबाबा ताहराबादकर (कांबळे) यांनी भक्तिविजय, संतलीलामृत, भक्तलीलामृत आदी संतचरित्रे लिहिलेली आहेत. त्यांनी एकूण २८४ संतांची चरित्रे लिहिलीत. त्यात तुकोबाराय व त्यांचे संतसांगाती संताजी जगनाडे यांच्या कार्याची प्रगल्भता सुंदर वर्णन केलेली आहे.
संतांच्या साहित्याविषयी व संतांविषयी मराठी माणसाच्या मनात अपार प्रेम आहे. केवळ प्रेमच नाही, तर आदरही आहे. श्रद्धा व प्रेम जतन केलेले आहे. संतचरित्र परमपवित्र असतात.
दि.८ डिसेंबर २०१८ रोजी सालाबाद प्रमाणे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव साजरा करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व तेलीसमाज बंधु-भगिनी यांनी मोठ्या संख्येने सहपरिवार उपस्थित राहुन मिरवणुकीची शोभा वाढवावी आसे आव्हान करण्यात आलेले आहे.
लिंगायत तेली समाज पुणे आयोजित १४ वा राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा 18 नोव्हेंबर 2018 रोजी राधाकृष्ण मंगल कार्यालय आंबेगाव काञज पुणे येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हा अध्यक्ष रवि कोरे आळणीकर यांचा उत्कृष्ठ समाज संघटन केल्याबद्दल सन्मान मुख्य लेखा व वित्त अधिकार जिल्हा परिषद कोल्हापूर मा.संजय राजमाने यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी लिंगायत तेली समाज पुणे जिल्हाअध्यक्ष गाताडे सर,
लिंब : आरफळ ता. सातारा येथे जरंडेश्वर मठापती प पु काळोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन समस्त तेली समाज संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. सातारा जिल्हा समस्त तेली समाजाचे दैवत असलेल्या जरंडेश्वर देवस्थानचे भूतपूर्व मठापती प पु काळोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त तेली समाजाच्या वतीने शुक्रवार दि . 2 नोव्हेंबर रोजी भजनाचा कार्यक्रम,