रविवार दि.७ जुलै २०१९ पुणे जिल्ह्यातील नंदनवन समजल्या जाणाऱ्या छोटे काश्मीर म्हणून एक आगळी वेगळी ओळख निर्माण करणारा मावळ तालुका येथील तळेगाव दाभाडे मधील गजबजलेल्या वस्तीतील नाना नानी पार्क सभागृहात मावळ तालुका तैलिक महासभेच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला.
संत जगनाडे महाराज हे संत तुकाराम महारांजाचे शिष्य होते. व ते तेली समाजाचे होते. खरेतर संताना जात नसते. संताचे कार्य अखिल मानव जातीच्या उध्दारासाठीच असते. जगनाडे महाराजाचा जन्म 8 डिसेंबर 1624 मध्ये पुणे जिल्हातील मावळ तालुक्यातील खेड जवळील संदुबरे येथे झाला. संताजी महाराजाचे वडीलांचे नाव विठोबा जगनाडे व आईचे नाव माथाबाई असे होते. हे पांडुरंगाचे निरसीम भक्त होते. त्यामुळे लहानपणापासुन महाराजांच्या बालमनावर धार्मीकतेचा पगडा होता. त्यांचे घरची आर्थीक परिस्थिती चांगली होती. श्री. संताजी जगनाडे महाराजांचे शिक्षण लिहीता वाचता येणे व हिशोब करता येणे एवढेच मर्यादीत होते.
श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती ८ डिसेंबर २०१९ रोजी साजरी करण्यात येत आहे. यावर्षी प्रथमच राज्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयात शासन आदेशानुसार जयंती साजरी करण्यात येणार आहे. पिंपरी -चिंचवड शहरात महापालिकेच्या वतीने प्रथमच दिनांक ८/१२/२०१९ रोजी सकाळी ठिक १०.०० वा. महापालिकेच्या मुख्य कार्यालयात पिंपरी येथे तळमजल्यावर जयंती साजरी करण्याचा कार्यक्रम आयोजीत केलेला आहे.
संत संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील चाकण या गावी ८ डिसेंबर १६२४ रोजी झाला. संताजींचे वडील विठोबा यांचा परंपरागत असा धान्यापासून तेल गाळून ते विक्री करण्याचा व्यवसाय होता. संताजींचे कुटुंब वारकरी संप्रदायाचे पाईक होते. घरात वंशपरंपरेने पंढरपूरच्या विठोबाची वारी अखंडित होती. घरातच ग्रंथांचे वाचन, पारायणे चालत. तसेच कीर्तन, प्रवचन यांना उपस्थित राहण्यात खंड नसे. हे सर्व संस्कार संताजींवर झाले. तत्कालीन परंपरेनुसार अगदी बाल वयातच विवाह होत असत. संताजींचा विवाह त्यांच्या वयाच्या ११ व्या वर्षी खेडच्या कहाणे घराण्यातील यमुनाबाई यांच्याशी झाला.
प्राचीन भारताचा इतिहास जितका समृद्ध आहे, तितकाच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात दक्षिण भारताचा इतिहास समृद्ध आहे. मध्ययुगीन बारावे शतक हे परिवर्तनाचे शतक मानले जाते. आजपासून 900 वर्षांपूर्वीची सामाजिक परिस्थिती खूप बिकट होती. माणूसच माणसाचा गुलाम बनला होता. मराठी कष्ट न करता फुकट खाणारा वर्ग समाजात वाढत होता. कष्ट करणारे अठरा आलुतेदार आणि बारा बलुतेदार कष्ट करत होते.