अंध विकास संस्थेस धान्यासह गणवेश द्यावा : श्रीविठ्ठल मंदिर समितीकडे मागणी
पंढरपूर - श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीकडून येथील अंध विकास संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी धान्य व गणवेश मिळावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेकडून मंदिर समितीला देण्यात आले.
मुंबई : तेली समाजाचा समावेश एन.टी. (National Tribe) मध्ये करावा, यासाठी बृहन्महाराष्ट्र तेली समाजाचे अध्यक्ष विलास वाव्हळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणीचे निवेदन दिलेले आहे.
वाल्हे, ता. २३ : श्री संत संताजी जगनाडे महाराज पालखी सोहळ्याचे सोमवारी सायंकाळी वाल्हे (ता. पुरंदर) येथे आगमन झाले. पालखी सोहळा तेली आळीमध्ये विसावला होता. मंगळवारी सकाळी पालखी सोहळा आळंदीच्या दिशेने मार्गस्थ झाला.
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे रोहयो व फलोत्पादन कॅबिनेट मंत्री व तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा ना जयदत्त आण्णा क्षीरसागर यांची मंत्री पदी निवड झाली बद्दल सातारा जिल्हा लिंगायत तेली समाजाचे वतीने मुबई मंत्रालय येथे सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. सातारा जिल्ह्यातील तेली समाजाचे विशेषतः गावोगावच्या स्मशानभूमीचे प्रश्न व विविध समस्या सोडविणे बाबत सकारात्मक चर्चा झाली.
श्री. अरूण इंगवले
संतपरेपरेतील अनुल्लेखाच्या ग्रहणाने ग्रासलेला तेजस्वी तारा म्हणून संताजी जगनाडे यांचा उल्लेख करावा लागेल. तुकारामांच्या प्रभावलीत वावरणार्या चौदा टाळकर्यात रामेश्वरभट्ट, महादजी कुलकर्णी, कोंडाजी लोकरे, मालोजी गाडे, कान्होबा यांचा समावेश असला तरी, तुकोबांच्या हृदयात स्थान असणारे सहकारी होते गंगाजी मावळ आणि संताजी जगनाडे. मालोजी गाडे तुकोबांचे जावई होते. आणि कान्होबा पाठचा भाऊ होता.