आज ८ डिसेंबर. ३९५ वी भगवद् भक्त जय श्री संताजी जगनाडे महाराज जयंती दौंड येथिल श्री विठ्ठल येथे सर्व समाजबांधव व भगिनींनी उपस्थित राहुन महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन आभिवादन केल.यावेळी जे काही दौंड शहर प्रशासकिय कार्यालयात ६ तारकेला छायाचित्रांच वाटप करण्यात आलं व जी.आर ची आम्मल बजावनी केली गेली
पुणे तिळवण तेली समाजाच्यावतीने आज संत शिरोमणी संताजी महाराज जयंतीनिमित्त भवानीपेठ कार्यालय ते पुणे महानगरपालिका येथेपर्यंत दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या दुचाकी रॅलीमध्ये सर्व पुणे शहरातील समाजबांधव एकत्रित जमा झाले. रॅली रामोशीगेट, मॉर्डन चौक, नानापेठ, लक्ष्मी रोड, पवळे चौक, कुंभारवाडा, शनिवार वाडा मार्गे पुणे महानगरपालिका येथे पोहचली.
राठोड तेली युवा सेना पुणे द्वारा दरवर्षी प्रमाणे राठोड गौरव पुरस्कार सोहळा - २०१९ व मोफत राठोड तेली उप वधु - वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आपल्या पाल्याची तसेच नातेवाईकांचे परिचय पत्र (Biodata) व्हाॕट्स ॲप किंवा, rathodteliyuvasena@gmail.com या संकेत स्थळा वर दि.२० डिसे. पर्यंत पाठवावे ही विनंती.
तेली समाजाचे आराध्यदैवत श्री.संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती रविवार दि. 8. डिसेंबर रोजी सर्व राज्यभर साजरी होत आहे.राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात जयंती साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कामगार कल्याण मंडळ कार्यालय चिंचवड या ठिकाणी तेली समाजाच्या महिला कार्यकर्त्यांच्या वतीने संताजी महाराज जगनाडे यांची प्रतीमा भेट देण्यात आली
तेली समाजाचे आराध्यदैवत श्री.संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती रविवार दि. 8 डिसेंबर रोजी सर्व राज्यभर साजरी होत आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात जयंती साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील विविध शासकीय कार्यालय पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, पी.एम.आर.डी.ए., तहसीलदार कार्यालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका,