Sant Santaji Maharaj Jagnade
कै. शंकरराव विश्राम काळे मुळचे वाळकीचे. शरीरयष्टी सडपातळ, रंगाने गोरे, लहानपणा पासून शांत व धार्मिक स्वभावाचे. दर आषाढीस पंढरपूरची वारी करणे. तसेच देहू आळंदीस जाणे, गोकर्ण, महाबळेश्वर, गया, प्रयाग, काशी वगैरे सर्व क्षेत्र फिरुन आले. त्यांना नाना या नावाने ओळखत. मुखात नेहमी पांडुरंगाचे नामस्मरण. ज्ञानेश्वरी अगदी मुखोद्गत. पहाटे उठून प्रातःविधी स्नान, पूजा आटोपून श्री ज्ञानेश्वरी वाचन.
कै. गणपतराव विश्राम काळे मुळचे राहणारे वाळकी म्हणून वाळकीकर या नावाने ओळखले जात शरीरयष्टी सडपातळ, उंच काठी गौरवर्णीः हट्टी स्वभाव व रागिट. वडिलांशी पटले नाही. त्यामुळे त्यांचे १५ व्या वर्षी लग्न होवून सासूरवाडीस (काष्टी) तेलघाण्याचा धंदा, दौंड काष्टी असा तेलाचा व्यापार करीत. नंतर काही दिवसांनी परत वाळकीस सहकुटुंब आले. परत काही दिवसांनी नगर. माळीवाडा वेशीजवळ जागेत तेलाचा धंदा सुरु केला.
तिळवण तेली समाजातील नगर जिल्ह्यातील पहिले डॉक्टरकीची परीक्षा उत्तीर्ण झालेले थोर समाज सेवक डॉ एस. टी. महाले यांच्या कार्याची थोडक्यात माहिती खाली देत आहोत. डॉ. एस. टी. महाले यांचा जन्म १४ मे १९२५ रोजी सिन्नर जिल्हा नाशिक येथोल दापूर या गावात एका सामान्य तेली कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सिन्नर व नगर जिल्ह्यातील संगमनेर येथे झाले. शिक्षण चालू असतानाच व बाह्य जगाचा कोणताही अनुभव नसलेल्या डॉक्टराचे वडील ते ११ वर्षांचे असताना वारले.
तेली गल्ली, एप्रिल 2010
पुणे - तिळवण तेली समाज संस्था भवानी पेठ पुणे या संस्थेची निवडणूक डिसेंबर २००८ मध्ये झाली होती. यावेळी परिवर्तन पॅनेलचे १५ जन बहुमताने निवडुन आले. पहिल्या प्रथम श्री. रामदास धोत्रे संस्था अध्यक्ष झाले. त्यांनी पुर्वी ठरल्या प्रमाणे आपला अध्यक्ष पदाचा राजीनामा समाज विश्वस्ता कडे जमा केला. त्या नंतर १५ सदस्यांच्या मिटींग मध्ये श्री. संजय दत्तात्रय भगत यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले.
एप्रिल 2010
पुणे :- कै. डॉ. भाऊसाहेब सहिंद्रकर चॅरीटेबल ट्रस्टच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त नुकतेच ज्येष्ठ अभिनेते श्री, जयराम कुलकर्णी व अभिनेते श्री. विजय मिश्रा यांच्या हस्ते श्रीमती सुमन सहिंद्रकर यांच्या अध्यक्षतेखाली सहकारनगर नं. १ येथील तळजाई वसाहतीतील गरीब व गरजू लोकांसाठी धर्मार्थ क्षेत्र चिकीत्सा आणि दंत चिकीत्सालय सुरू करण्यात आले या उद्घाटनानिमित्त