श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
कै. नामदेव विठोबा क्षिरसागर. सावकार हे सावकार म्हणन प्रसिद्ध असून या नावाने ओळखले जात. सोयरिक जमविणे, निवडणूक प्रचारात भाग घेणे यात त्यांचा हातखंडा असे. घोड्याचे शौकिन असत. त्यात त्यांची पारख उत्तम. तांगा पासिंगचे वेळी त्यांना बोलावून घेत. गरिबांबद्दल अस्था, तेव्हां त्यांचे सांगणेवरुन कामे होत व करवून घेत असत.
श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
श्री. अंबादास व काशिनाथ पलंगे यांच्या घराण्यात पूर्वापार एैतिहासिक काळा पासून श्री. तुळजाभवानी मातेच्या पलंगाचा मान मिळत आलेला आहे. कुलस्वामिनी तुळजापुरची भवानी माता ही उभ्या महाराष्ट्राचे कुलदेवत. श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य दैवत. श्री. छत्रपतीना भवानी मातेने आशिर्वाद देवुन महाराष्ट्रात स्वराज्य स्थापनेची आज्ञा केली व हिंद धर्माचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करविली.
कै. शंकरराव विश्राम काळे मुळचे वाळकीचे. शरीरयष्टी सडपातळ, रंगाने गोरे, लहानपणा पासून शांत व धार्मिक स्वभावाचे. दर आषाढीस पंढरपूरची वारी करणे. तसेच देहू आळंदीस जाणे, गोकर्ण, महाबळेश्वर, गया, प्रयाग, काशी वगैरे सर्व क्षेत्र फिरुन आले. त्यांना नाना या नावाने ओळखत. मुखात नेहमी पांडुरंगाचे नामस्मरण. ज्ञानेश्वरी अगदी मुखोद्गत. पहाटे उठून प्रातःविधी स्नान, पूजा आटोपून श्री ज्ञानेश्वरी वाचन.
कै. गणपतराव विश्राम काळे मुळचे राहणारे वाळकी म्हणून वाळकीकर या नावाने ओळखले जात शरीरयष्टी सडपातळ, उंच काठी गौरवर्णीः हट्टी स्वभाव व रागिट. वडिलांशी पटले नाही. त्यामुळे त्यांचे १५ व्या वर्षी लग्न होवून सासूरवाडीस (काष्टी) तेलघाण्याचा धंदा, दौंड काष्टी असा तेलाचा व्यापार करीत. नंतर काही दिवसांनी परत वाळकीस सहकुटुंब आले. परत काही दिवसांनी नगर. माळीवाडा वेशीजवळ जागेत तेलाचा धंदा सुरु केला.
तिळवण तेली समाजातील नगर जिल्ह्यातील पहिले डॉक्टरकीची परीक्षा उत्तीर्ण झालेले थोर समाज सेवक डॉ एस. टी. महाले यांच्या कार्याची थोडक्यात माहिती खाली देत आहोत. डॉ. एस. टी. महाले यांचा जन्म १४ मे १९२५ रोजी सिन्नर जिल्हा नाशिक येथोल दापूर या गावात एका सामान्य तेली कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सिन्नर व नगर जिल्ह्यातील संगमनेर येथे झाले. शिक्षण चालू असतानाच व बाह्य जगाचा कोणताही अनुभव नसलेल्या डॉक्टराचे वडील ते ११ वर्षांचे असताना वारले.