चंदननगर-येरवडा-वडगांवशेरी-विमाननगर-विश्रांतवाडी-कळस-धानोरी-लोहगांव-वाघोली-फुलगांव श्री. संताजी प्रतिष्ठानच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी ही तिळगुळ व हळदी-कुंकू विद्यार्थ्यांचा गुणगौरव व स्नेहभोजन समारंभ स्थळ : मातोश्री अनुसया सांस्कृतिक हॉल, श्री. साईबाबा मंदिरा जवळ, नगररोड, पुणे-४११०१४. रविवार दि. ०२/०२/२०२० रोजी सायं. ६.०० ते ९.०० या वेळेत आयोजित केला आहे.
श्री संताजी हितवर्धीनी संस्था, पुणे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजन रविवार दिनांक २६ जानेवारी २०२० रोजी स. १० ते सायं.५ वा. स्थळ - गट क्र. २५६/१ आळंदी मरकळ रोड, विकासवाडी, धानोरे, पुणे. येथे करण्यात आलेले आहे. प्रमुख उपस्थिती मा. आ. श्री. महेशदादा लांडगे भोसरी मतदार संघ., कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. अनिल पंजाबराव घुटे पिंपळोद, अमरावती.
इवलासा वेल लाविला...... आज थोडे मागे वळून पाहिले.... तर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे बघता बघता दोन वर्षं झाली... आमच्या अहमदनगरच्या ...आदर्श असा म्हणण्यास लावणारा हा वधू वर मेळावा पाहता पाहता तिसऱ्या वर्षात सुद्धा तितक्याच उत्साहाने यशस्वीपणे साजरा झाला. दिनांक १ डिसेंबर २०१९ रविवार रोजी झालेल्या या मंगल दिनी, ऐतिहासिक दिनी अहमदनगर शहर व जिल्हा तेली समाज, संताजी विचारमंच अहमदनगर याच बरोबर सर्व समाज बंधू-भगिनी यांच्यावतीने आयोजित.... भव्यदिव्य वधू-वर पालक परिचय मेळावा
वाई तेली समाज आयोजित श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा रविवार, दिनांक २९/१२/२०१९ रोजी सकाळी १०.३० वाजता श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी निमित्त खालील कार्यक्रम आयोजित केले आहे. १.मूर्तीपुजा १०.३० वा. २. विद्यार्थी गुणगौरव ११.०० वा. ३.श्री संताजी महाराज यांचे जीवन चरित्र (टीव्ही सिरिअल प्रक्षेपण) १२.०० वा. ४. मान्यवरांचे मनोगत १.०० वा. ५. महाप्रसाद १.३० वा. तरी सर्व समाज बांधवांनी सहकुटुंब उपस्थित रहावे आशी विनंती करण्यात आलेली आहे.
इंदोरी, ता. २६ : दरवर्षी श्रीक्षेत्र सुदुंबरे येथे श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी उत्सव सोहळ्याचे जोरदार नियोजन सुरू आहे. या सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. यंदा समितीचे अध्यक्ष म्हणून इंदोरीचे उद्योजक जयंत सूर्यकांत राऊत यांची एकमताने निवड केली. श्री संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्थेच्या सर्वसाधारण सभेत ही निवड केली.