एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 2 )
अक्षरे गिरवावित आशा वेळी प्लेग व घराला अडचणींचा डोंगर मिळालेला. प्लेग जाताच ते शाळेत जावु लागले. उर्दु व मराठी शाळा होती. तेथे जमेना मग काही जण घरगुती शाळा चालवत होते तिकडे गेले. शाळा दोन तीन झाल्या पण शिक्षण फक्त इयत्ता तिसरीतच थांबले. या शाळे पेक्षा पोटाचा प्रश्न मोठा होता. या पुस्तकी शिक्षाणा पेक्षा बाहेरिल जगाची शाळा पोटाचा प्रश्न सोडवु शकते. त्यांनी व्यवसायात लक्ष दिले. पण लगेच परत प्लेगने आपली पाऊले पुण्यात भक्कम रोवली.
एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 1 )
ज्या त्या काळात आपल्या कर्तुत्वाने काहींनी सुर्यच कवेत घेतला होता तो घेताना पोळले, भाजले, तडफले पण सुर्या जवळ जाऊन तो सुर्य प्रकाश चारही दिशेला पोहच करणारी दुर दृष्टी असलेल्या काही महान व्यक्ती त्या काळात होऊन जातात. त्यांच्या कार्याचा आदर्श हा शेकडो वर्ष नंदादिप आसतो. तो तेवत ठेवणे ही समाजाची जबाबदारी आसते. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे ही एक असामान्य व्यक्तीमत्व. त्यांच्या जीवन कार्याचा शोध व बोध.
तिळवण तेली समाजाच्या वतीने नवनिर्वाचित महापौर मुरलीधर मोहोळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तेली समाज पुणे शहर अध्यक्ष घनशाम वाळुजकर, कार्याध्यक्ष दिलीप शिंदे, सचिव सचिन नगिने, विश्वस्त प्रवीण बारमुख, पतित पावन संघटनेचे खडकवासला विभाग अध्यक्ष विजय क्षीरसागर, तिळवण समाजाचे प्रकाश कोकणे, हेमंत भोज, सुरेश शिंदे, अमोल शिंदे उपस्थित होते.
आज ८ डिसेंबर. ३९५ वी भगवद् भक्त जय श्री संताजी जगनाडे महाराज जयंती दौंड येथिल श्री विठ्ठल येथे सर्व समाजबांधव व भगिनींनी उपस्थित राहुन महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन आभिवादन केल.यावेळी जे काही दौंड शहर प्रशासकिय कार्यालयात ६ तारकेला छायाचित्रांच वाटप करण्यात आलं व जी.आर ची आम्मल बजावनी केली गेली
पुणे तिळवण तेली समाजाच्यावतीने आज संत शिरोमणी संताजी महाराज जयंतीनिमित्त भवानीपेठ कार्यालय ते पुणे महानगरपालिका येथेपर्यंत दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या दुचाकी रॅलीमध्ये सर्व पुणे शहरातील समाजबांधव एकत्रित जमा झाले. रॅली रामोशीगेट, मॉर्डन चौक, नानापेठ, लक्ष्मी रोड, पवळे चौक, कुंभारवाडा, शनिवार वाडा मार्गे पुणे महानगरपालिका येथे पोहचली.