Sant Santaji Maharaj Jagnade
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने देशभरात जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केल्यानंतर सातारा जिल्ह्यातील तेली समाज बांधवांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी आणि आपला उत्साह व्यक्त करण्यासाठी सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघाच्या वतीने सातारा शहरात एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि संत श्री संताजी जगनाडे महाराज महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने लालबाग-परळ विभागात गुढी पाडव्याच्या स्वागतार्थ भव्य शोभायात्रेचे आयोजन मोठ्या जल्लोषात पार पडले. या शोभायात्रेस समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने स्व. ग. द. आंबेकर पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते व कामगार नेते दिलीप खोंड यांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सचिन भाऊ अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला.
नवीन हिंदू वर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर वीरशैव तेली समाजातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक स्नेहभेट आयोजित करण्यात आली होती. वीरशैव तेली समाज संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात समाजातील ज्येष्ठांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.
मुंबई: गुढी पाडवा 2025 च्या निमित्ताने गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि संत श्री संताजी जगनाडे महाराज महासंघाच्या सहकार्याने भव्य हिंदू नववर्ष शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभायात्रेचे तेली समाजाच्या वतीने विशेष स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे.