तेली समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, सांगली जिल्हा अंतर्गत सांगली शहर तेली समाज, सांगली आयोजीत भव्य राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय स्नेहमेळावा तेली समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि कर्तृत्व, नेतृत्व व दातृत्वाच्याही आघाडीवर अग्रेसर असणारे स्व. शशिकांत (आण्णा) गणपती फल्ले यांनी निर्माण केलेल्या अनेक समाजोपयोगी परंपरांपैकी एक असणारा 'राज्यस्तरीय तेली समाज वधू-वर व पालक परिचय मेळावा' याही वर्षी दिमाखात साजरा होत आहे.
रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ, रत्नागिरी (संलग्न : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा) द्वारा श्री संत संताजी महाराज जगनाडे सहकारी पतसंस्था मर्या., रत्नागिरी, तेली आळी, रत्नागिरी - ४१५६१२ संस्था नोंदणी क्र.महा./१३९९ / रत्ना. / ९४ व धर्मादाय आयुक्त नोंदणी क्र. एफ/१३८९/रत्ना./९४)
पिंपरी - आरक्षणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनात मराठा समाजाने काही लोकप्रतिनिधींची घरे, कार्यालये आणि वाहने जाळली. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने हवेली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी या वेळी करण्यात आली.
राहुरी - सालाबाद प्रमाणे शुक्रवार २५ ऑगस्ट रोजी राजूर ते शनिशिंगणापूर तेल कावड यात्रेचे राहुरी शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. तेली समाजाच्यावतीने आणि राहुरी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष ताराचंद तनपुरे यांच्या हस्ते कावड यात्रेस तेल अर्पण करण्यात आले. या वेळी नामदेव महाराज शेजूळ, सदाशिव पवार,
तळेगाव दाभाडे,: तळेगावचा सुपुत्र डॉ. ऋत्विक बारमुख याची चौथ्या नासा स्टार प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. अंतराळ तंत्रज्ञान वापर व संशोधन या विषयावर १९ सप्टेंबर २०२३ ते २७ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत परिषदा व चर्चासत्रे होणार असून त्यात ऋत्विकला सहभागी होता येणार आहे.