श्रीगोंदा : काष्टी मध्ये सर्व जाती... धर्म ... पंथनी... एकत्र येऊन सर्व धर्म समभावाने राष्ट्रीय ऐक्य साधत... जगद्गुरु संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे यांची ३९९ वी जयंती जन्मोत्सव काष्टी ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहात साजरी केली.
पुसेसावळी : पुढारी वृत्तसेवा : राजाचे कुर्ले (ता. खटाव) येथे संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. संत संताजी जगनाडे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन केले. यावेळी दादासो माने, पोलिसपाटील प्रशांत माने, ग्रामसेवक उमेश पाणसरे,
अहमदनगर- संतश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या शिकवणीनुसार तेली समाजाची वाटचाल सुरू आहे. प्रत्येकाने एकमेकांशी आपुलकीने व प्रेमाने वागावे. श्री संताजी महाराजांनी जगद्गुरु संत तुकोबाराय यांची बुडालेली गाथा पुन्हा तंतोतंत लेखन करून समाजापुढे आणली.
ठाणे महानगर तेली समाज संस्थेच्या माध्यमातून श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९९ जयंती कार्यक्रमा अंतर्गत ८ डिसेंबर २०२३ रोजी समाजातील काही प्रतिनिधी विविध शासकीय कार्यालयात जयंती उत्सवात सहभागी झाले होते. श्री अनंत तेली. (ठाणे महानगर पालिका आणि नवीमुंबई महानगरपालिका बोधचिन्हकार व जेष्ठ सल्लागार) श्री रघुनाथ चौधरी (ज्येष्ठ सल्लागार)
पिंपरी, ता. ८ : पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. "थोर संत संताजी जगनाडे महाराजांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्ता आणि उत्तम स्मरणशक्तीच्या