पैठणः प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य सोलार इंडस्ट्रीज उद्योजकांची पुणे येथे झालेल्या महाराष्ट्रव्यापी परिषदेमध्ये कमी वयात सर्वोत्कृष्ट सोलार उद्योगात कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य युवा उद्योजक (सोलार ऑफ द इयर या पुरस्काराने अजिंक्य भगवान मिटकर यास सन्मानीत करण्यात आले.
सासवड (ता. पुरंदर) - येथील धान्य बाजारपेठेतील महादेव मंदिर येथून कावडीने वाजतगाजत कऱ्हा स्नानासाठी प्रस्थान ठेवले. कावड कहे काठावरील संगमेश्वर महादेव मंदिर येथे आली. या ठिकाणी कावडीला भाविकभक्तांच्या वतीने कहा स्नान घालण्यात आले.
कोथरूड श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूडच्या वतीने ३० कार्यक्षम व विवध क्षेत्रात नैपुण्य मिळविणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री प्रिया बेर्डे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक पृथ्वीराज सुतार होते. याप्रसंगी संताजी प्रतिष्ठान आदर्श शिक्षिका पुरस्कार- मोहिनी आणेकर यांना देण्यात आला.
वडगाव मावळ : शिंदे फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथील संत संताजी महाराज जगनाडे यांच्या समाधिस्थळ मंदिर विकासासाठी २५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली. दरम्यान, माजी मंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी यासाठी भरीव निधीची मागणी केली होती. सरकारने निधी जाहीर केल्याने भेगडे यांच्या मागणीला यश आल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.
संत जगनाडे महाराज यांचे जन्मस्थळ श्री क्षेत्र सुदुंबरे येथे असून, त्यांच्या स्मारकाला भरघोस निधी मिळावा यासाठी नागपूर येथे तेली समाजाच्या दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आग्रही मागणी केली होती. आज उपमुख्यमंत्री महोदयांनी स्मारकासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.