चाकण : ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या संत संताजी महाराज जगनाडे जयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. चाकण (ता. खेड) येथे संत संताजी महाराज जगनाडे यांचे जन्मस्थान आहे. जयंती उत्सवानिमित्ताने सकाळी साडेसहा वाजता संताजी महाराजांच्या जन्मस्थळी प्रतिमा पूजन करण्यात आले. साडेआठ वाजता रामचंद्र महाराज धाडगे यांचे संताजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रवचन झाले
शिर्डी :- शिर्डी शहरातील श्री साईबाबा समाधी मंदिर प्रवेशद्वार गेट क्र ४ येथील चौकाला श्री संत संताजी महाराज चौक असे नामकरण करून त्याचे उद्घाटन शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री सतीश दिघे साहेब, प्रथम नगराध्यक्ष श्री कैलास बापु कोते, माजी नगराध्यक्ष श्री शिवाजीराजे गोंदकर, भाजपा शहर अध्यक्ष श्री सचिन भाऊ शिंदे यांच्या उपस्थितीत फित कापून करण्यात आले.
संत साहित्याने समृद्ध असेल्या महाराष्ट्रात अनेक संतांनी आपल्या प्रगल्भ अमृत विचार वाणीतून समाजच्या उत्थानासाठी मार्गदशन केले आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव यांच्यापासून ते अलीकडच्या काळातील संत तुकडोजी महाराजांपर्यंत अशा अनेक संतांनी समाजाच्या उत्थानासाठी आपल्या बौद्धिक विचारांनी संत साहित्याला समृद्ध केले आहे.
श्रीगोंदा : काष्टी मध्ये सर्व जाती... धर्म ... पंथनी... एकत्र येऊन सर्व धर्म समभावाने राष्ट्रीय ऐक्य साधत... जगद्गुरु संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे यांची ३९९ वी जयंती जन्मोत्सव काष्टी ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहात साजरी केली.
पुसेसावळी : पुढारी वृत्तसेवा : राजाचे कुर्ले (ता. खटाव) येथे संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. संत संताजी जगनाडे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन केले. यावेळी दादासो माने, पोलिसपाटील प्रशांत माने, ग्रामसेवक उमेश पाणसरे,