पिंपरी चिंचवड शहर तेली समाज आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व कौटुंबिक स्नेह मेळावा २०२३ रविवार दिनांक २३/०७/२०२३ रोजी सकाळी १० ते २, स्थळ - संतोष मंगल कार्यालय संतोष नगर, १६ नं. बस स्टॉप, औंध - रावेत रोड, थेरगांव, पुणे ३३.
सर्व वारकरी समाज, बांधव, देणगीदार व अन्नदाते, यांच्या सहकार्यातुन पंढरपूर येथील संस्थेच्या मालकीच्या जागेवर नियोजीत श्री संताजी सांस्कृतिक भवन इमारतीचा भुमिपूजन समारंभ आषाढ शु. १० शके १९४५ बुधवार दिनांक २८/६/२०१३ रोजी सकाळी ११-०० वाजता करण्याचे योजिले आहे. तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे ही नम्र विनंती करण्यात आलेली आहे.
पुणे, ता. ६ : लोणी काळभोर येथे श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या नावे 'स्कील सेंटर' उभारण्याची मागणी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या पुणे शहर शाखेतर्फे निवेदनाद्वारे नुकतीच करण्यात आली. पुण्यात तेली समाजाचे सुमारे लाख नागरिक राहत असून, त्यांना या सेंटरचा लाभ घेता येईल, अशी अपेक्षा शहराध्यक्ष गणेश चव्हाण यांनी व्यक्त केली.
श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड, पुणे आयोजित भव्य राज्यस्तरीय तेली समाज मोफत वधू-वर पालक परिचय मेळावा २०२४ ( मोफत ), रविवार, दि. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी स. १० ते सायं. ५ वा. स्थळ : आशिष गार्डन, डिपी रोड, कोथरूड, पुणे ३८ संपर्क कार्यालय व फॉर्म स्वीकारण्याचा पत्ता श्री संताजी भवन सर्वे नं ८८/ ७ ब, वेताळनगर, एकता कॉलनी, राका साई मंदिराजवळ,
कोथरूड, दि. २७ - वधु-वर सूचक केंद्र काळाची गरज आहे. आपल्या आई-वडिलांच्या मतांना मोठे महत्त्व आहे, ते ही विचारात घ्यावे, असे मत संस्थेचे अध्यक्ष रमेश भोज यांनी व्यक्त केले. श्री संताजी प्रतिष्ठान कोथरूडच्या वतीने तेली समाजाच्या वधुवर सुचक केंद्राचे उद्घाटन विवाह संस्थेचे जनक शामराव भगत आणि मनोहर डाके