Sant Santaji Maharaj Jagnade
पिंपरी - आरक्षणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनात मराठा समाजाने काही लोकप्रतिनिधींची घरे, कार्यालये आणि वाहने जाळली. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने हवेली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी या वेळी करण्यात आली.
राहुरी - सालाबाद प्रमाणे शुक्रवार २५ ऑगस्ट रोजी राजूर ते शनिशिंगणापूर तेल कावड यात्रेचे राहुरी शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. तेली समाजाच्यावतीने आणि राहुरी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष ताराचंद तनपुरे यांच्या हस्ते कावड यात्रेस तेल अर्पण करण्यात आले. या वेळी नामदेव महाराज शेजूळ, सदाशिव पवार,
तळेगाव दाभाडे,: तळेगावचा सुपुत्र डॉ. ऋत्विक बारमुख याची चौथ्या नासा स्टार प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. अंतराळ तंत्रज्ञान वापर व संशोधन या विषयावर १९ सप्टेंबर २०२३ ते २७ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत परिषदा व चर्चासत्रे होणार असून त्यात ऋत्विकला सहभागी होता येणार आहे.
पिंपरी चिंचवड शहर तेली समाज आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व कौटुंबिक स्नेह मेळावा २०२३ रविवार दिनांक २३/०७/२०२३ रोजी सकाळी १० ते २, स्थळ - संतोष मंगल कार्यालय संतोष नगर, १६ नं. बस स्टॉप, औंध - रावेत रोड, थेरगांव, पुणे ३३.
सर्व वारकरी समाज, बांधव, देणगीदार व अन्नदाते, यांच्या सहकार्यातुन पंढरपूर येथील संस्थेच्या मालकीच्या जागेवर नियोजीत श्री संताजी सांस्कृतिक भवन इमारतीचा भुमिपूजन समारंभ आषाढ शु. १० शके १९४५ बुधवार दिनांक २८/६/२०१३ रोजी सकाळी ११-०० वाजता करण्याचे योजिले आहे. तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे ही नम्र विनंती करण्यात आलेली आहे.