श्री संताजी सेवा मंडळ, पुणे, धायरी, वडगाव, सिंहगड परिसर प्रतीवर्षी प्रमाणे यावर्षीही रविवार, दि. ८ जानेवारी २०२३ रोजी श्री संताजी सेवा मंडळाच्या वतीने श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. तरी या प्रसंगी सर्वांनी अवश्य उपस्थित राहावे, ही विनंती करण्यात आलेली आहे.
रा. तेली युवा सेना महाराष्ट्र अंतर्गत श्री संताजी महाराज वधु-वर मेळावा समिती आयोजित राज्यस्तरीय तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा - २०२३ तेली समाज भुषण पुरस्कार व आदर्श माता सन्मान सोहळा रविवार दि. २२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० ते सायं ५ वाजेपर्यंत मेळाव्याचे ठिकाण: श्री संताजी जगनाडे महाराज तेली संस्था श्री क्षेत्र सुदुंबरे, ता. मावळ, जि. पुणे परिचय पुस्तिकेसाठी वधु - वराची माहिती.
श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा समस्त तिळवण तेली समाज संघटना, कोरेगाव ता. कोरेगाव जि. सातारा मार्गशीर्ष वद्य १३ बुधवार दि. २१ डिसेंबर २०२२ रोजी पुष्पवृष्टी दुपारी ०१.०५ वाजता सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघ मान्यवरांच्या उपस्थितीत
८ डिसेंबर रोजी संत भगवद भक्त शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती देऊळगाव राजे येथील तेली समाज यांनी मतिमंद मुलांच्या शाळेत साजरी केली. समस्त तेली समाज देऊळगाव राजे व तेली समाज दौंड उपस्थित होते. आर्वी फाट्या जवळ निवासी मतिमंद मुलांची कृषी प्रशिक्षण कार्यशाळा मुक बधीर आश्रम शाळा आहे. तेथे ४० ते ४५ विशेष आणि दिव्यांग मुले आहेत त्यांना खाऊ वाटप चे नियोजन करण्यात आले होते,
श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदुंबरे, श्रीक्षेत्र सुदुंबरे, ता. मावळ, जि. पुणे. श्री संत संताजी महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम पत्रिका मार्गशीर्ष वद्य सप्तमी ते मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी दि. १५ डिसेंबर २०२२ ते २२ डिसेंबर २०२२ अखंड हरिनाम सप्ताह.