युवकांच्या हाती सत्ता दिली तर ते देशाचा फार मोठा विकास करतील, असे स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे. युवक म्हणजे उत्साहाचा झरा मुर्तिमंत झळाळते चैतन्य युवकांमध्ये फार मोठी शक्ती आहे. मी तुम्हांला आशाच युवकाची आज ओळख करून देणार आहे. त्यांचे नाव आहे श्री. प्रशांत चंद्रकांत भागवत.
पण त्यांनी दिवसभर राब राब राबायचे 24 तास काम करायचे आणि नोकरीत पर्मनंट नाही. हा अन्याय कशासाठी ? त्यांनाही मुले - बाळे आहेत, संसार आहे. नोकरीवरून काढले तर खायचे काय ? त्यांना नोकरीत पर्मनंट केलेच पाहिजे
बंधुभगिनींनो अशा प्रकारे दुसर्यांसाठी भांडणारा झगडणारा हा तरूण. त्यावेळी ते होते 26 वर्षांचे वडिलाच्या शब्दाचा मान राखण्यासाठी कॅडबरी कंपनीत नोकरी केली. युनियन निवडणुकीत उभे राहिले, भरघोस मतांनी निवडुन आले. यावरून त्यांच्याबद्दल कामगारांना केवढा विश्वास होता हे दिसते निवडुन आल्याबरोबर त्यांनी 250 लोकांना पर्मनंट करण्यात सिंहाचा वाटा घेतला. आज त्या लोकांचे संसार सुखात आहेत.
एैतिहासीक परंपरेतील हे गांव याच गावात भागवत पिड्यान पिड्या रहातात. याच गावात याच घरात श्री. अंबादास शिंदे यांचे आजोळ. जवळच सुदूंबरे. श्री. उद्धवराव घडले ते सुदूंबरे व इंदोरीत जमेल तेवढे शिक्षण पुर्ण करून त्यांनी कॅडबरी कंपनीत नोकरी केली. वडील कै. धोंडीबा राऊत यांच्या बरोबर मंदिरात भजनात पखवाज वाजवत होते. श्री. भागवत हे लहानपणापासुन सुदूंबरे येथेे श्री संताजी स्मृती दिनात सामिल होते आहेत. आज सेवा निवृत्त असल्याने बराच वेळ शेती व समाज कार्यात मग्न असतात.
खेड तालुक्यातील चांदूस हे गांव, भाम नदी ओलंडताच ठाकुर पिंपरीचा फाटा, या फाट्या पासूनच डोंगराची सोबत लागते. 4/5 कि.मी. जाताच डोंगर दर्यातला खाच खळग्यांच्या रस्ता. बरेच अंतर चालुन गेल्यावर आड रानात विक्रांत ढाबा व फॅमीली गार्डन रेस्टॉरंट या आडबाजूच्या रस्त्यावर मला श्री. विजय शंकर व्यवहारे भेटले. त्यांच्या सोबत घरी गेलो तेंव्हा एक धक्का बसला. सौ. दगडाबाई शंकर व्यवहारे वय वर्षे 73 होत्या. ओळख होताच सांगीतले मी तळेगावच्या श्री. सहदेव मारूती मखामले यांची मोठी बहिण. मला प्रसंग आठवला सन 1977-78 मध्ये एका साहित्य संम्मेलनाला कविता पाठवली तर सयोजकांनी जिव्हाळ्याचे पत्र पाठवुन निंमत्रण दिले. आणी सहदेव मखामले यांनी प्रथम मला रंगमंचावर उभे केले. माझ्या पुस्तकाला ही प्रस्तावना दिली. तर एका जेष्ठ कवींची या भगीनी त्या जेंव्हा सौ. व्यवहारे म्हणुन चांदूस येथे आल्या तेंव्हा नुसतीच डोंगरे, नुसताच उभा पाऊस. त्या पावसात कशी ही वाढलेली झाडे. व झुडपे श्री. शंकरराव बाळकृष्ण व्यवहारे हे घरचा तेल घाना घेत. तेल पेंड निर्माण करून त्यांची विक्री करी. उशाला बखळ शेतीजमीन तेवढी शेती करित होते. त्यांना 2 मुले व 4 मुली यांचे हे सुखी कुटूंब डोंगर दर्यात वावरत होते.
वधु-वर मेळावे काळाची गरज म्हणुन मेळावे सुरू नव्हते. किंवा आजच्या सारखी वधु-वर मेळाव्या ही गोरख समाज सेवा अस्तीत्वात नव्हती. तेव्हां विस्कळीत समाजात कै. शंकरराव कर्डीले उभे होते. गणेश पेठेत ते घर चालविण्यासाठी धडपडत. बाकीचा सर्व वेळ समाज कार्यालयात जात असत. खुर्चीच्या मागे न लागता तेथे येणार्या वधु-वर पालकांच्या संपर्कात रहात. शहरातील व आजुबाजुच्या समाजाच्या लग्न समारंभात हाजर आसत. त्या ठिकाणी येणार्या बांधवांना ते जवळ करीत आणी वधुवरांची लग्न जमवुन देत. या साठी पदर मोड ही त्यांनी केली.
वाकड येथिल समाजबांधव श्री. रामहरी चिलेकर हे एक शेतकरी कुटूंबातील बांधव कै. ज्ञानोबा तुकाराम व मातोश्री सुशीला ज्ञानोबा चिलेकर या आई वडिलांच्या संस्कारात वाढलेल. आपण समाजाचे दे लागते ते आपण दिलेच पाहिजे ही प्रणली रूजलेली याच मुळे ते समाजाच्या विविध उपक्रमा सक्रीय सहभाग घेतात त्यांचे नातलग बंडोपंत शेलार व श्री काळूशेठ शेजवळ यांच्या सानिध्यात सामाजीक निष्ठा प्रबळ झालेली. मला काही तरी करावयाचे आहे ही प्रणाली यांच्याकडे आहे ही बाब श्री संत संताजी पालखी सोहळ्याच्या पदाधीकार्यांच्या नजरेस आली त्यांनी विनंती केली तेंव्हा श्री रामहरी ज्ञानोबा चिलेकर यांनी पंढरपुर येथिल समाज वास्तु सोर सुमारेदिड लाख रूपयांचे बांधकाम वडीलांच्या स्मरणार्थ बांधुन दिले. या साठी श्री. संतोष, श्री. सुनिल व आई यांंनी सहकार्य केले. पालखी सोहळा संस्था या सर्वांचे आभारी आहे.