Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

अहमदनगर तेली समाजाचे समाज रत्न कै. नारायण तुकाराम देवकर

कृतार्थ कै. नारायण तुकाराम देवकर यांच्या आत्मचरित्राचा काही भाग

     Bhavani Mata, Teli samaj and janakoji Bhagat 12 मार्च 1938 माझा जन्मदिवस. सहासष्ट वर्षांच्या कालप्रवाहांत अनेक सुहृद भेटले, देवासारखी माणसं भेटली, तर काही दानवासारखी देखील. तरी देखील माझ्यातला नारायण अविचल राहिला, सार्‍या झंझावाताला तोंड देत माग्रक्रमण करीतच राहिला.

    भूतकाळातल्या आठवणींचा हा प्रवास, मला घेऊन जातो तो नगर शहराच्या पूर्वेस वसलेल्या बुर्‍हानगरला. जगदंबामातेचं देवस्थान. तुकाराम भुजंगा देवकर माझे वडिल. आमचं सारं घराणंच भगताचं. भगताचं म्हणजे देवीमातेच्या पुजार्‍याचं. पण पूजेवर मिळणार्‍या उत्पन्नातून घर चालविताना वडिलांची ओढाताण व्हायची. मिळणारं उत्पन्न आणि खाणारी तोंडं याचं गणित काही बसत नव्हतं. घरामध्ये दारिद्रयाचा सुखेनैव वावर चालू होता. पोटच्या पोरांसाठी काही तरी करणं भाग होतं. देवीमातेची मनोभावे सेवा करणारे आमचे वडील मग असहाय्यपणे काम करू लागले., तेल्याच्या घाण्यावर. भिंगारच्या मुरलीधर ढवळे यांच्या तेल घाण्यावर रात्रंदिवस कष्ट करणार्‍या पिताजींनी,  बुर्‍हानगरचा जड अंत:करणाने निरोप घेऊन प्रवेश केला, तो नगर शहरात. 

दिनांक 11-06-2016 13:14:06 Read more

तेली समाजाचेे पन्‍हाळे यांचा राजुरचा पेढा

        श्री. राजेंद्र दशरथ पन्हाळे यांनी या व्यवसायात तसा बर्‍यापैकी जम बसवला. श्री. अभिजित श्रीराम पन्हाळ हे स्वत: पदवीधर आहेत. नोकरी न करता त्यांनी घरच्या राजुरच्या पेढ्यात लक्ष दिले. आज नुसता फक्त पेढा बनविणस 10/12  कामगार रोज राबत असतात. किमान 1000 किलो पेढा हा शिर्डी येथे जात आसते. दुध खरेदी, पेढा विक्री, पेढा निर्मीती हे सर्व श्री. अभिजीत पन्हाळे स्वत: पहात आहेत. आणी राजुर पेढ्याला प्रतिष्ठा देत आहेत.

 

दिनांक 11-06-2016 12:51:46 Read more

जामखेड तेली समाजाचे टेकाळे

       श्री. संजय हे पदवीधर आहेत. आपल्या शिक्षणाचा उपयोग नोकरी मागे न जाता त्यांनी व्यवसयात लावला पक्षीय राजकारणा पासुन दुर राहुन व्यवसाय व समाजकार्य करणे हा छंद जोपासला नगर व पुणे येथील वधु-वर मेळाव्याला सक्रीय सहभाग. नगर जिल्हा तेली महासभेचे क्रियाशिल सदस्य श्री. संजयशेठ या माध्यमातुन जामखेड तालुका तेली बांधवांच्या विकासाला हातभार लावतात.

दिनांक 11-06-2016 12:35:26 Read more

अहमदनगर तेली समाजाचे श्री बद्रिनाथ पंढरीनाथ लोखंडे

     समाजिक कार्याची आवड असल्यामुळे समाजाचे काम करण्याची संधी मिळाली व शिर्डीत मोठा तेली समाज असल्यामुळे सांघीक वातावरण तयार झाले. पुढे तालुका संघटनाचे काम चालु झाले त्यात मला कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली. ती मी जबाबदारीने पुर्ण करत आहे. आज नगर जिल्ह्यात राहाता तालुक्याचे काम मोठ्या आघडीवर आहे. संताजी महाराजांची दिनदर्शिका आम्ही चार वर्षापासुन करत आहोत. प्रतिमा पुजन, नविन उपक्रम चालु केला त्यात सुद्धा यश मिळाले

दिनांक 11-06-2016 12:28:27 Read more

तेली समाजाचे श्री. रमेश सदाशिव भोज

      श्री संताजी प्रतिष्ठाण कोथरूड येथे संघटक म्हणुन काम पहात असुन नुकताच एक वधु वर मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याचे कार्याध्यक्ष म्हणुन जबबदरी पार पाडली. या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला महाराष्ट्रातील कनाकोपर्‍यातील समाज बांधव हजर होते. या मेळाव्याचे वैशिष्ट्ये म्हणजे मोफत प्रवेश होता.

    हे सर्व सामाजिक काम आपली नोकरी सांभाळुन घर संभाळुन कामाचे खाडे न होता आणि विशेष करुन त्यांच्या पत्नीच्या सहकार्याने सौ सुनिता भोज यांच्या मदतीनेच ते करू शकले असे ते अभिमानाने सांगतात अता गरज आहे तुमच्या आशिर्वादाची सहकार्याची आणि प्रेमाची.

दिनांक 11-06-2016 12:20:00 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in