Sant Santaji Maharaj Jagnade
जुन्नर येथील माजी नगरसेवक व सुदुंबरे संस्था माजी सचीव जेष्ठ समाजसेवक श्री वसंत रघुनाथ करडिले यांचे पुतने नगरसेवक तेली समाज भुषण अविनाश दत्तात्रय करडिले यांची जुन्नर नगरपरीषदेच्या स्विकृत सदस्य पदी निवड झाल्या बद्दल अभिनंदन हार्दिक शुभेच्छा . शुभेच्छूक - वसंत रघुनाथ करडिले
ओबीसीहिताची बाजू न्यायालयात मांडणार
पुणे :- सरकारने राज्य मागासवर्ग आयोगावर केलेल्या नियुक्ता बेकायदेशीर असल्याने त्या तत्काळ रद्द करून नव्याने आयोगाची रचना करावी , अशी मागणी ओबीसी संघर्ष समितीतर्फे करण्यात आली. मराठा आरक्षणाविषयक उच्च न्यायालयातील याचिकेवर 435 ओबीसी जातींतर्फे ओबीसीहिताची बाजू प्रखरपणे मांडली जाईल, असा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे प्रतिज्ञापत्र या आठवड्यात सादर केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
अध्यक्ष श्री. संभाजीराव म्हसे मराठा मोर्च्याचे आहेत तेव्हां - आयोगावर ओबीसीच अध्यक्ष हवा
पुणे, दि. 3 फेब्रुवारी: राज्य सरकारने नवीन राज्य मागासवर्ग आयोगाची फेररचना केली असून आज या आयोगाची पहिली बैठक पुण्यात पार पडली. या आयोगाची निवड ही बेकायदेशीर असून अध्यक्ष श्री. संभाजीराव म्हसे मराठा मोर्च्याचे उपाध्यक्ष असल्याने त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशा मागणीचे निवेदन आज ओबीसी संघर्ष समितीने त्यांना दिले व त्यांच्या कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. या आयोगावर ओबीसीच अध्यक्ष हवा अशीही मागणी करण्यात आली.
पुणे - येथिल तिळवण तेली समाज कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला. सकाळी विश्वस्त सुनिल राऊत यांच्या हास्ते ध्वज फडकविण्यात आला या वेळी सर्वश्री घनश्याम वाळुंजकर, संजय भग्रत, प्रकाश कर्डिले, अशोक सोनवणे, दिलीप वाव्हळ, रामदास धोत्रे, माऊली व्हावळ, संजय व्हावळ, वाघचौरे, अजय शिंदे, रमेश भोज, विजय शिंदे व संतोष उबाळे, या सह सर्वश्री अंबादास शिंदे, रत्नाकर दळवी, सुभाष काका देशमाने, संजय पवार व सर्व समाज बांधव उपस्थीत होते.
महाराष्ट्राच्या समाजाच्या इतिहासात पन्हाळे कुटूंबाला एक प्रतिष्ठा आहे. कै. अमृतराव पन्हाळे यांनी व्वसायाची दिशा दिली होती. आपला व्यवसाय संभाळून समाज कार्यात सहभाग घेत. तेली गल्ली मासिकाच्या मोफत वधु-वर पुस्तकेे प्रकाशन ही 1990 मध्ये त्यांच्या व मा. जयदत्त क्षिरसागर आमदार यांच्या उपस्थीत झाले होते. तेली समाजाच्या स्तुत्य उपक्रमात ते सहभागी असत. आपले योगदान ते देत असत. पुण्याच्या मंगळावर पेठेतील खडीच्या मैदाना जवळील नागेश्वर मंदिर हे श्रद्धास्थान. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे व कै. किसन रामचंद्र पन्हाळे यांचेे श्रद्धास्थान कै. अमृतशेठ पन्हाळे यांना कळू लागले आगदी तेंव्हा पासून स्वत: सायकल वर जाऊन नागेश्वराला दुध देत.